कामशेत सह नऊ गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार सुरळीत व्हावा, यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या 40 लाख 70 हजार निधीतून स्वतंत्र मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
खडकाळे कार्यालयातर्गत कामशेत, खामशेत, कुसगाव, चिखलसे, अहिरवडे, कान्हे, नायगाव, जांभुळ, साते या गावांचा महसूल कारभार पाहिला जातो. शेती संदर्भातील सर्व दस्तावेज व नोंदी ठेवणे, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देणे, ई-पीक पाहणी इ. उपक्रमांची अंमलबजावणी करणे अशा कामांमुळे ही कार्यालये महत्त्वपूर्ण असतात. ( Talathi and Mandal offices will be constructed in Kamshet with funds of MLA Sunil Shelke )
“कार्यालयांच्या दुरावस्थेमुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून नवीन स्वतंत्र कार्यालये बांधण्यात येणार असल्याने सामान्य नागरिकांचे काम सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होईल.” – सरपंच रुपेश गायकवाड.
कामशेत परिसराचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. मागील अनेक वर्षांपासून तलाठी कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने गैरसोय होत होती. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना देखील अपुऱ्या जागेमध्ये कामकाज करावे लागत होते. आता मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या सुसज्ज व स्वतंत्र कार्यालयांमुळे नागरिकांना उत्तम सेवा-सुविधा मिळतील व महसुली कामकाजाला गती मिळून नागरिकांना येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर होतील.
या कार्यक्रमास सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच दत्तात्रय रावते,तानाजी दाभाडे, करण ओसवाल, सुनिल भटेवरा, विलास भटेवरा,आतिक सिद्धिकी, निलेश दाभाडे, गजानन शिंदे, सुभाष रायसोनी, राजू बेदमुथा,नरेश बेदमुथा, मंगेश राणे,सतीश इंगवले, शब्बीर शेख,आप्पा गायखे, संतोष काळे, परेश बरदाडे, दत्तात्रय शिंदे,अभिजीत शिनगारे,गणपत शिंदे, बाळासाहेब काजळे, गणेश भोकरे, योगेश दाभाडे, कविता काळे,उषा इंगवले,राजश्री थोरवे,अर्चना शिंदे,अनुराधा कांबळे, मनीषा धुरेकर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटील रडले, ‘मी असेन नसेन माहिती नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं’, पत्रकार परिषदेत जरांगे भावूक
– आई एकविरा देवी देवस्थान कार्ला गडावर भाजपाकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम । Karla Lonavala News
– Breaking! महाराष्ट्र सरकारकडून 22 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर, श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सुट्टी जाहीर