व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा… । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 23, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Manoj-Jarange-Sunil-Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. बुधवार, दिनांक 24 जानेवारी रोजी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा येथे जाहीर सभेचे नियोजन असुन मुक्काम देखील याच ठिकाणी होणार आहे. याकरिता सुमारे 100 एकर पेक्षा अधिक जागा साफसफाई करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सभेची जोरदार तयारी या ठिकाणी सुरु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सकल मराठा समाजाचे हजारो तरुण या ठिकाणी मदत कार्य करीत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. आज (दि. 23) दुपारी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी या सभेच्या ठिकाणाला भेट देत जागेची पाहणी केली. तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती घेतली. ( Maratha Reservation Manoj Jarange Patil Stayed at Lonavala Maval on 24th January MLA Sunil Shelke Field inspection )

यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या भव्य स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज झाला आहे. सर्व समाजातील बांधवांनी शक्य होईल त्या पद्धतीने सहकार्य करावे. मावळ तालुक्याने नेहमीच जातीय सलोखा आणि एकोपा जपला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणे आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपल्या तालुक्याकडून कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे,’ असे आवाहन देखील आमदार शेळके यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– मुंबईच्या दिशेने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ 24 तारखेला मावळ तालुक्यात येणार; वाकसई इथे 100 एकरात जंगी सभेची तयारी । Maratha Reservation
– सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली गाडी, एफडीएच्या धडक मोहिमेत 47 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त । Pune Crime News
– ‘मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी’; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन


Previous Post

कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil

Next Post

विविध सरकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि बेलस्टार यांचा संयुक्त उपक्रम । Alandi News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
women-gathering-alandi

विविध सरकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि बेलस्टार यांचा संयुक्त उपक्रम । Alandi News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.