व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News

आमदार सुनिल शेळकेंसह खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरू आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 24, 2024
in ग्रामीण, लोकल
Shrirang-Barane-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळकेंसह खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरू आहे. खासदार बारणे यांनी आंदर मावळ भागातील गावांचा दौरा करत विविध विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण केले. आंदर मावळमधील डोंगरवाडी ते धनगर पठार अति दुर्गम भागातील नागरिकांसाठी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, विविध विकास कामांचे लोकार्पण खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. तसेच मावळमधील अनेक गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ते झाल्याने नागरिकांनी खासदार बारणे यांचे आभार मानले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तहसिलदार विक्रम देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, टाटा पावरचे फुलसुंदर साहेब, मनोहर म्हात्रे, सुनिल मोरे, सरपंच छाया हेमाडे उपस्थित होते. तसेच वेहरगांव दहिवली, मळवली, वाकसई देवघर व लोणावळा शहरातील तुंर्गाली भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. या वेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, श्रीधर पुजारी, आरपीआयचे नेते सुर्यकांत वाघमारे, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, सुनिल हगवणे, सुनिल मोरे, सागर हुलावळे, वेहरगाव सरपंच वर्षाताई मावकर, पाटन सरपंच प्रवीण तिकोने, मळवली सरपंच अस्लम शेख, वाकसई सरपंच मोनाली जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी लवकर सुरू झालेला दौरा रात्री साडे नऊ वाजता दौरा संपला. रात्री उशीर हेऊनही ग्रामस्थ,गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( MP Shrirang Barane Completed Bhoomi Pujan Of Development Works Worth 21 Crores In Andar Maval )

खासदार बारणे यांनी सर्वाधिक निधी डोंगरभाग, आदिवासी पाडे असलेल्या मावळ तालुक्याला दिला आहे. वडेश्वर, नागाठली, कुसुवली, डाहुली, खांड कुसुर, निळसी, सावळा, इंगळून, कशाळ किवळे, भोईरे, कल्हाट, निगडे, कोडींवडे, टाकले बु.,घोनशेच कचरेवाडी येथील भूमिपूजने केली. डोंगरवाडी ते धनगर पठार या अती दर्गम भागात आजपर्यंत रस्ता नव्हता. या भागात खासदार बारणे यांच्या हस्ते रस्त्याचे काम सुरु झाले. रस्ता होत असल्याने आनंद झालेल्या धनगर बांधवांनी घोंगडी देऊन खासदार बारणे यांचा सत्कार केला. या रस्त्यांमुळे गावक-यांची ये-जा करण्याची चांगली सोय होणार आहे.

खासदार बारणे म्हणाले की, मावळ तालुका मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. कमी लोकवस्ती असलेली गावे आहेत. या गावांमधील अंतर्गत रस्ते पक्के नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. गावातील रस्ते विकास करण्यावर भर दिला. वाड्या, वस्त्यांपर्यंत रस्ते करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्वाधिक निधी मावळसाठी दिला आहे. दीनदयाळ योजनेअंतर्गत दुर्गम भागातील गावांमध्ये वीज पोहोचविली आहे. दुर्गम भागात स्वातंत्र्या नंतर रस्ते लाईट केल्याचे समाधान होते. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील कशाळे कडाव ते मावळ तालुक्यातील खांडी कुसुर मार्गे भीमाशंकर पर्यंत जाणारा मार्ग होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी सोय होणार आहे.

अधिक वाचा –
– अंतिम मतदार यादी जाहीर! महाराष्ट्रात 9 कोटी 12 लाख मतदार, पुणे जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा मतदारसंघ, मावळ विधानसभेतही मतदारांची वाढ
– मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव सज्ज; जागोजागी संघर्षयोद्ध्याच्या स्वागताचे बॅनर । Manoj Jarange Patil In Lonavala Maval
– महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मण शितोळे यांची निवड, मावळ तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यात कुठल्या शहरात आणि किती वाजता येणार मराठा समाजाचे भगवे वादळ? पाहा मनोज जरांगे यांचे आजचे वेळापत्रक । Maratha Reservation Manoj Jarange Patil

Next Post

लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lohagad-Fort

लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.