भाताचे आगार असलेल्या मावळ तालुक्यातून कृषी संदर्भात महत्वाची बातमी आहे. मावळ तालुक्यात भात पीक कापणीला आल्याने शेतकऱ्यांकडून भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपर्यंत भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हमखास हाताशी येते. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर भात पिक कापणीला तालुक्यात जोरात सुरुवात झाली आहे. ( Rice Paddy Crop Harvesting Star In Kusgaon Pavan Maval Video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे यावर्षी मावळ तालुक्यात भाताचे पीक चांगले जोमदार आल्याचे दिसत आहे. कृषि विभागाने खरीप हंगामात मे महिन्यापासूनच सुयोग्य नियोजन केले. शेतकऱ्यांना गावोगावी प्रशिक्षण घेऊन योग्य वाणाची निवड, बिजप्रक्रिया, गादी वाफ्यावर रोपवाटिका, चारसूत्री आणि एसआरटी लागवड याबाबत माहिती देऊन प्रकल्प, शेतीशाळा, प्रात्यक्षिक राबवून नवनवीन प्रयोग केले होते.
हेही वाचा – मावळ तालुक्यातील लाखो भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! भातविक्री आणि किंमतीचे टेन्शन होणार दूर
कृषि विभागाच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर केलेल्या कामाला यश आले आहे. सध्यस्थितीला मावळात पाऊसाने उघडीप दिल्यामुळे भात कापणीला वेग आला आहे. मावळमधील पवनमावळ भागातील कुसगाव येथे चंद्रकांत तोंडे यांनी रिपर भातकापणी यंत्राने कापणी चालू केली आहे. शेतकरी लवकर भात तयार करून लवकर घरामध्ये जाईल यादृष्टीने मशीनद्वारे भाताची कापणी करायला लागले आहेत.
अधिक वाचा –
– कामशेतमध्ये नागरिकांनी सामुहिकरित्या ऐकली पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’
– शिवसेना मावळचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांच्यावर उद्धव ठाकरेंकडून नवी जबाबदारी I Shiv Sena Maval Taluka