व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सिडकोच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, वाढीव रक्कम होणार कमी, लवकरच मिळणार ताबा । Maval Lok Sabha News

मावळ लोकसभा मतदारसंघातील तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील 2019 मध्ये लॉटरीत घर जिंकलेल्या चार हजार लाभार्थ्यांना लवकरच घरांचा ताबा दिला जाणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 23, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
CIDCO-Taloja

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील 2019 मध्ये लॉटरीत घर जिंकलेल्या चार हजार लाभार्थ्यांना लवकरच घरांचा ताबा दिला जाणार आहे. वाढीव रक्कम देखील कमी केली जाणार असून लवकरच घरांचा ताबा दिला जाणार आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

लॉटरीमध्ये घर लागलेल्या लाभार्थ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली. आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर खासदार बारणे यांनी तत्काळ सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्यासोबत बैठक घेतली. डिग्गीकर यांनी तातडीने घरांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे उपस्थित होते. (CIDCO Beneficiaries Will Get Possession of their Houses Soon in Taloja Said Maval MP Shrirang Barne)

सिडकोच्या लॉटरीत 2019 मध्ये चार हजार लाभार्थ्यांना घर मिळाले. परंतु, या नागरिकांना अद्याप ताबा मिळाला नाही. सदनिकेच्या ताब्यासाठी दिर्घकाळापासून ते वाट पाहत आहेत. पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सिडकोच्या माहिती पुस्तकात 31 मे 2022 व काही काळानंतर मे 2024 मध्ये ताबा देण्यात येईल अशी नोंद आहे. त्यानंतर रस्त्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर ताबा दिला जाईल असे लाभार्थ्यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. परंतु, आजतागायत रस्त्याचे काम झाले नाही. घराचा ताबा मिळालेला नाही.

लाभार्थ्यांना बँकेच्या कर्जाचे हप्ते, व्याज तसेच घराचे भाडे असा आर्थिक भार पडत आहे. सोडतीच्यावेळी सांगितल्यापेक्षा ईडब्ल्यूएस आणि एलआयजी सदनिकेच्या किमती वाटप पत्रात वाढवून दिल्या आहेत. या दोन्ही क्षेत्रातील प्रति तीन ते पाच लाखाची वाढ करण्यात आली असून आर्थिक आव्हानात भर पडली आहे. भरमसाठ वाढ करुन भरुन घेतलेली रक्कम लाभार्थ्यांना पुन्हा मिळावी. विलंब करुन प्रतिदिवसाच्या आकारलेल्या दंडाची नुकसान भरपाई देण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल । Mumbai Pune Expressway News
– वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval
– लोणावळा जवळील लायन्स पॉइंट येथे दरीत कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

पुढील 30 वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; वाचा काय म्हणाले अजितदादा । Pune News

Next Post

मोठी बातमी! भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणेंकडून अडीच कोटी निधी देण्याचा संकल्प, एक कोटीचा धनादेश सुपूर्द

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang-Barne-bhandara-dongar

मोठी बातमी! भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणेंकडून अडीच कोटी निधी देण्याचा संकल्प, एक कोटीचा धनादेश सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.