मराठा आरक्षण आंदोलनातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जालन्यात अंतरवाली सराठी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. 25) पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. मला ठार मारण्याचा डाव आहे. परंतू मला मारायचंच असेल तर मी तुमच्या सागर बंगल्यावर येतो, तिथे मला मारा असे बोलताना जरांगे प्रचंड आक्रमक झाले. जरांगे पाटलांनी बैठकीतून थेट सांगर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला आणि ते तडक उठून मुंबईच्या दिशेने निघाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
अंतरवालीतील बैठकीतून सागर बंगल्यावर येणाचा इशारा देताना जरांगे पाटील ताडकन उठले आणि तत्काळ जाण्यासाठी निघाले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना शांत करण्याचा आणि अडवण्याचा प्रयत्न केला, परंतू जरांगे आता मुंबईच्या दिशेने निघाले असल्याची माहिती समोर येत आहे. जरांगे पाटलांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने अंतरवाली सराटी येथे मोठा गोंधळ उडाला आहे. (maratha manoj jarange patil headed towards mumbai protesting at devendra fadnavis sagar bungalow jalna antarwali sarathi news)
यातून जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच सलाईन घेणं बंद केलं असा गंभीर आरोप करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा, असं आवाहनही मनोज जरांगेंनी दिले. माझा बळी पाहिजे, देतो असं म्हणत फडणवीस यांचे नाव घेत मनोज जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
अधिक वाचा –
– महाराष्ट्रातील ‘या’ सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनिर्वाचित 6 खासदारांची नावे । Rajya Sabha Election 2024
– वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; ‘मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू’ – आमदार सुनिल शेळके
– ‘पोक्सो’ कायदा आणि ‘निर्भया’ योजनेबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांना वडगाव मावळ येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून सखोल मार्गदर्शन