वडगाव मावळ शहरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या फायद्याचा कोणताही विचार न करता, निव्वळ बिल्डर धार्जिणा विकास आराखडा बनविण्यात आला असल्याचा आरोपा शहर भाजपाने केला आहे. त्याबाबत मंगळवारी (दि. 12 मार्च) भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक प्रविण निकम यांची भेट घेऊन त्यांना हरकतीचे निवेदन दिले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
निवेदनात प्रामुख्याने;
क्रमांक 1 – वडगाव बाजार पेठेतील रस्ता हा 15 ते 18 मीटर रुंदीचा केलेला असून तो 10 ते 12 मीटरचा असावा
क्रमांक 2 – मागील 10 वर्षांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर झालेल्या ओपन स्पेस एमिनिटी स्पेस ह्या जागा प्रथम पब्लिक युटीलिटी म्हणजेच क्रिडांगण, अथवा गार्डन, व्यायामशाळा वा अन्य बाबींसाठी नागरिकांच्या सोयीकारिता ताब्यामध्ये घ्याव्यात. तसेच स्थानिक शेतकरी यांनी अनेक वर्षांपासून जपून ठेवलेल्या जमिनींवर टाकलेले आरक्षण काढून, ते त्वरित रद्द करावे.
क्रमांक 3 – आंबेडकर कॉलनीमधील हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब जनतेच्या घरावर पार्किंग आणि किफायतशीर घरे याकरिता आरक्षित दाखवले आहे. ते देखील रद्द करण्यात यावेत.
क्रमांक 4 – शेतकऱ्यांच्या सपाट माळरान जमिनीवर वनीकरण असा शेरा दिलेला दिसत असून तो सुद्धा रद्द करण्या यावा,
अशा प्रमुख मुद्यांना अधोरेखित करून प्रशासकांना निवेदन देण्यात आले.
वडगाव मावळ शहरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार वर्ग, शेतकरी आणि व्यापारी यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपाच्या वतीने प्रविण निकम यांच्याकडे करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष मुख्यधिकारी प्रविण निकम यांनीही याबाबत सकारात्मक चर्चा केल्याचे भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले. निवेदनावर स्थानिक व्यापारी, शेतकरी यांच्या सह्या घेऊनच हे निवेदन देण्यात आले आहे. ( Vadgaon Maval Nagar Panchayat Development Plan City BJP Take Objection On DPR Plan )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कान्हे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News
– इंद्रायणी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन । Talegaon Dabhade
– मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड