जागतिक महिला दिनाचे ( 8 मार्च) औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे याठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेतील सर्व महिला पालक आणि विद्यार्थिनी करिता विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करून महिला दिन उत्साहात साजरा केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर पंचायत समिती मावळच्या विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख निर्मला काळे, वडगाव शाळेवर बढती मिळालेल्या मंगला ढोरे आणि कान्हे शाळेतून केंद्रप्रमुख पदी बढती मिळून बेबडओहोळ केंद्रात गेलेल्या सविता क्षीरसागर या चारही शिक्षण क्षेत्रातील रणरागिणींचा सन्मान सत्कार करण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तसेच गावातील ज्येष्ठ महिला अलका ठाकर, कमल राजगुरे, वत्सला भांगरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक कान्हेच्या व्यवस्थापक मेघा रुईकर आणि सहाय्यक कैलास वायदंडे यांनी विशेष उपस्थिती होती. कान्हे शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा देखील यावेळी सन्मान यावेळी करण्यात आला. ह्यावेळी शालेय विद्यार्थिनी आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील यशस्वी महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या स्वप्नाली आरोटे यांनी शालेय विद्यार्थिनीं सोबत “महिला जीवनावर आधारित नृत्य “सादर करून कार्यक्रमांची शोभा वाढवली. याकामी शाळा व्यवस्थापन समितीने बक्षीसांचे आयोजन केलेले होते. ( various programs organized at zp school Kanhe On occasion of International Womens Day 8th march )
सदर कार्यक्रमाचे नियोजन सुनिता देशमुख मॅडम यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संगीता मधे यांनी केले. शाळेतील तंत्रस्नेही शिक्षिका अक्षता आंबरुळे यांनी सर्व महिला भगिनींचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर, उपाध्यक्षा रेणुका सातकर, सदस्या आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे, प्रणोती कदम, रोहिणी वाघमारे, पूजा लष्करी, नंदिता दास, कुंदा चौरे, सविता दोडे तसेच प्राजक्ता राजगुरू यांनी केले होते.
अधिक वाचा –
– ‘एकल भगिनी सक्षमीकरण’ अभियान, मावळ राष्ट्रवादी देणार महिलांना आधार । Maval Taluka NCP
– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती । Lonavala News
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News