राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी नंदकुमार सोपानराव कोतुळकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या हस्ते कोतुळकर यांना लोणावळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात नियुक्ती पत्र देण्यात आले. या पत्रावर तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांची स्वाक्षरी आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते कोतुळकर यांचा सन्मान करण्यात आला. कोतुळकर हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असून राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते, उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. शहरात साहेबांच्या विचारांना घेऊन पक्ष अधिक बळकट करणार असल्याचे नंदकुमार कोतुळकर यांनी दैनिक मावळशी बोलताना सांगितले. ( Nandkumar Kotulkar Appointed as President of Talegaon Dabhade City of NCP Sharad Chandra Pawar Party )
अधिक वाचा –
– मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड
– ‘एकल भगिनी सक्षमीकरण’ अभियान, मावळ राष्ट्रवादी देणार महिलांना आधार । Maval Taluka NCP
– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती । Lonavala News