मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या माध्यमातून ‘एकल भगिनी (विधवा) सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे. ह्या अभियानाअंतर्गत मावळ तालुक्यातील प्रत्येक गावामधील एका विधवा महिलेस स्वयंरोजगारासाठी मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 21 ते 50 वयोगटातील विधवा महिला यासाठी लाभार्थी म्हणून पात्र असतील. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
प्रत्येक गावनिहाय विधवा महिलांची माहिती घेऊन स्थानिक पदाधिकारी व राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे एका महिलेचे नाव काढण्यात येईल आणि या चिठ्ठीद्वारे नाव आलेल्या महिलेस शिलाई मशीन देण्यात येणार आहे,अशी माहिती तालुकाध्यक्षा दिपाली गराडे यांनी दिली. ( Ekal Bhagini Empowerment Campaign through Maval Taluka NCP Mahila Congress )
पतीचे अकाली निधन झाल्यानंतर बहुतांश महिलांच्या वाटेला हालअपेष्टाच येतात. त्यामध्ये काही महिलांच्या घरची स्थिती चांगली असेल तर त्यांना आर्थिक अडचणी जास्त जाणवत नाहीत. परंतू सामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले, तर त्या महिलेवर आभाळ कोसळते. घराचा आणि मुलांचा सांभाळ करणे देखील कठीण होऊन जाते. अशा विधवा भगिनींच्या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणीतरी शाश्वत आधार दिला की त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होतो. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास देखील मिळतो. त्यामुळेच विधवा महिलांसाठी राष्ट्रवादीने चांगला उपक्रम हाती घेतला असुन या अभियानाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.
“विधवा महिलांच्या प्रश्नाबाबत केवळ सहानुभूती न ठेवता त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. या महिलांना आधार मिळावा, स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्न सुरु व्हावे यासाठी राष्ट्रवादीचा हा उपक्रम आशादायक ठरेल.” – दिपाली गराडे (तालुकाध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस)
अधिक वाचा –
– महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha
– लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू
– मोठी बातमी! पीडीसीसी बँकेद्वारे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार