पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी 1 एप्रिलपासून सुमारे 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या व्याज अनुदानाचा फायदा शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे, अशी माहिती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तळेगाव दाभाडे येथील बँकेच्या शाखेत माऊली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली बॅंक वसुली अधिकारी, शाखा अधिकारी यांची संयुक्त सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, ते बोलत होते. या सभेला बँकेचे उपव्यवस्थापक संजय शितोळे, विभागीय अधिकारी गुलाब खांदवे, बॅंक वरिष्ठ अधिकारी धवलराज पवार, नीलेश खोतसह बँक अधिकारी तसेच योगेश राक्षे, बाबुराव येवले, गणेश काजळे उपस्थित होते. ( 100 crores loan will be distributed to farmers of Maval taluka by PDCC Bank )
‘शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांपासून 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. ही कर्जे एक एप्रिलपासून दिली जाणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या कर्ज विभागात संपर्क करावा. केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी बांधवांना जे कर्ज दिले जाते. त्या कर्जावरील व्याजासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व व्याजात सूटही दिली जाते.’ – माऊली दाभाडे
शेतकऱ्यांना शेती, शेतीपूरक जोडधंदा, गाई, म्हैस, शेळ्या मेंढ्यापालन, कुकुटपालन तसेच यांत्रिकीकरण, टॅक्टर व इतर शेतीयंत्र खरेदीसाठी बँकेकडून कर्जपुरवठा केला जाणार आहे. तसेच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कृषी पायाभूत सुविधा निधी
अधिक वाचा –
– सराईत मोटारसायकल चोराला अटक, एक दोन नव्हे तब्बल 16 मोटारसायकली हस्तगत, 14 गुन्ह्यांची उकल । Pune Crime
– ‘द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करा’, मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
– पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील 13 पोलिस निरिक्षकांची नेमणूक, तळेगाव दाभाडे येथे ‘या’ दमदार अधिकाऱ्याची नेमणूक । Pimpri Chinchwad Police