कामशेत येथे होणाऱ्या श्री संत रोहिदास महाराज भवनच्या सीमा भिंत बांधकामांचे भुमिपुजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले. कामशेत येथे आठ गुंठे जागेवर लवकरच भव्य असे श्री संत रोहिदास महाराज भवन साकारण्याचा मनोदय चर्मकार समाजातील बांधवांचा आहे. या भुमिपुजन प्रसंगी बोलताना आमदार सुनिल शेळके बोलताना म्हणाले की, मावळ तालुक्यातील चर्मकार समाजातील बांधवांचा अभिमान वाटतोय की त्यांनी एकत्रित येऊन आज स्वतः जागा घेऊन भवन बांधण्याचा संकल्प केला आहे. सदर भवन बांधकामासाठी एकुण दीड कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील 50 लाख रुपये निधी देण्याची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली. तसेच कामशेत ग्रामपंचायत कडून 15 व्या वित्त आयोगातुन 10 लाख देण्याचे सरपंच रुपेश गायकवाड यांनी जाहीर केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेशभाऊ साळवे, माजी मंत्री ज्ञानेश्वर कांबळे, दिपक हुलावळे, पै. संभाजी राक्षे, मा नगरसेवक प्रमोद गायकवाड, बाजार समिती संचालक साहेबराव टकले, उपसभापती नामदेव शेलार, भरतभाऊ हरपुडे, संघटनमंत्री नारायणराव ठाकर, एस आर पी तालुकाध्यक्ष बबन ओव्हाळ, कामशेत सरपंच रुपेश गायकवाड, संस्थापक अंकुश आंबेकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विकी लोखंडे, माजी नगरसेवक अरुण माने, विश्वस्त एकनाथ कदम, खरेदी विक्री संघ संचालक किरण हुलावळे, तालुका चर्मकार संघ अध्यक्ष रमेश मानकर;
विश्वस्त जमुना पटेकर, मा.नगरसेविका आरोही तळेगावकर, रेश्मा मानकर,संस्थापक अशोक मानकर, संस्थापक संजय शिळवणे, अध्यक्ष संत रोहिदास महाराज ट्रस्ट दिनेश जाधव, नवनाथ आंबेकर, विलास मानकर, विश्वस्त सुरेश गायकवाड, दत्तात्रय जाधव, आमोल गायकवाड, रुपचंद गायकवाड, दत्ता कदम, साहेबराव आंबेकर, निवृत्ती कदम, ज्ञानेश्वर कदम, रमेश शिंदे,संकेत जगताप, नितीन गायकवाड, कायदेशीर सल्लागार सुनील पटेकर, ठेकेदार यश बच्चे आदीजण उपस्थितीत होते. ( Bhoomi Pujan by MLA Sunil Shelke of Sant Rohidas Maharaj Bhavan border wall Kamshet )
अधिक वाचा –
– पवन मावळ भागातील उर्से, आढे, सडवली, बऊर गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke
– सराईत मोटारसायकल चोराला अटक, एक दोन नव्हे तब्बल 16 मोटारसायकली हस्तगत, 14 गुन्ह्यांची उकल । Pune Crime
– ‘द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करा’, मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन