पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिसांनी एका सराईत मोटारसायकल चोराला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 16 मोटारसायकली हस्तगत केल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण 14 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. योगेश शिवाजी दाभाडे (वय 24 वर्ष, रा. वळसाने, ता. साक्री, जि. धुळे) असे या चोराचे नाव आहे. त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एकंदर 17 मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
भोसरी परिसरात मोटारसायकली चोरीचे प्रमाण वाढल्याने भोसरी पोलिसांचे पथक याचा तपास करत होते. अनेक ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना मोटारसायकल चोराची ओळख पटली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने आपला साथीदार मॉन्टी वाघ (वय 22 वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याला बरोबर घेऊन भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी परिसरात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. 16 मोटार सायकली पोलिसांना काढून दिल्या. या मोटारसायकलींची किंमत सुमारे 3 लाख 84 हजार रुपये इतकी आहे. ( Motorcycle thief arrested 16 motorcycles seized 14 crimes solved Pimpri Chinchwad Police )
या चोराच्या अटकेमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील 07 गुन्हे, म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील 02 गुन्हे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, चाकण पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, सांगवी पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, खडकी पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, लोणीकंद पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, असे एकंदर 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, निरीक्षक रूपाली बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोरे, हवालदार हेमंत खरात, नाईक नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, मुळे, अंमलदार स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली.
अधिक वाचा –
– महावितरणच्या चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन उपविभागासह दोन शाखा कार्यालयांची निर्मिती । Pune News
– कामशेत येथील पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे प्रवासादरम्यान निधन । Journalist Chandrakant Lole passed away
– विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार, सोमाटणे येथे पोलिसांची धडक कारवाई, 5 जण रंगेहात ताब्यात । Pune Crime