व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, तसेच देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीने लढू आणि मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचाच खासदार दिल्लीत पाठवू, असा निर्धार यावेळी सर्वांनी केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 11, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
maval-lok-sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांच्या प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची समन्वय बैठक रविवारी (दि. 10) पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क नेते तथा आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.‌ महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, तसेच देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीने लढू आणि मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचाच खासदार दिल्लीत पाठवू, असा निर्धार यावेळी सर्वांनी केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

ह्या बैठकीत देशातील, राज्यातील परिस्थितीवरून केंद्रातील सरकार कशा पद्धतीने दडपशाहीचे धोरण राबवत आहे. माणसाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सत्तेतील भाजपकडून सुरू असल्याचं मत यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडले. तसेच देशाच्या हितासाठी आपल्याला या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करावे लागणार आहे. त्या करिता आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. आगामी लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आहे. त्याकरिता मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील, असं सर्वांनी नमूद केले. ( Maha Vikas Aghadi candidate for Maval Lok Sabha Constituency Shivsena UBT Sanjog Waghere )

पिंपरी चिंचवडमधील या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, स्वराज इंडिया पक्षाचे मानव कांबळे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक मारुती भापकर, बाबू नायर, आम आदमी पार्टी शहराध्यक्षा मीना जावळे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रवीण कदम, माकप शहराध्यक्ष गणेश जराडे, काँग्रेस महिला नेत्या निगार बारस्कर, शामला सोनवणे, अनिता तुतारे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा अधिकारी चेतन पवार, माजी शहराध्यक्ष योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, मराठा महासंघाचे प्रकाश जाधव, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव आदींसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, विधानसभा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संजोग वाघेरे लोकसभेत जातील –
महाराष्ट्रात कशा पद्धतीने विरोधी पक्षाचे नेते फोडून राजकीय पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेवर आलेल्या संकटानंतर देखील आपले नेते उद्धव ठाकरे रोखठोक भूमिका घेऊन लढत आहेत.‌ त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून उध्दव ठाकरे यांनी संजोग वाघेरे पाटील यांना जबाबदारी दिली आहे.‌ त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे, त्यांचे शिलेदार म्हणून संजोग वाघेरे पाटील हेच विजयी होऊन लोकसभेत जातील, अशी भावना यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडली.

अधिक वाचा –
– कामशेतमध्ये श्री संत रोहिदास महाराज भवन बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी देणार, आमदार सुनिल शेळकेंची घोषणा । Kamshet News
– राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोणावळा येथे शिक्षक संमेलनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी सर्वांगिण प्रगतीची संधी द्या – राज्यपाल
– पवन मावळ भागातील उर्से, आढे, सडवली, बऊर गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू

Next Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-ncp

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.