व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘समोर कोण उमेदवार माहिती नाही’, बारणेंच्या या विधानाचा वाघेरेंकडून खरपूस समाचार, ‘मतदार बारणेंच्या अहंकाराचा अंत करतील’

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा संजोग वाघेरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shrirang Barane And Sanjog Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा संजोग वाघेरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. कासारवाडी येथे झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्रीरंग बारणे यांनी, माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे, हे मला माहीत नाही, असे विधान करत संजोग वाघेरे यांना महत्व देत नसल्याचे दाखवून दिले होते. परंतू आता बारणे यांच्या त्याच विधानाचा संजोग वाघेरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. इतकेच नाहीतर वाघेरेंनी बारणेंवर जहरी टीका सुद्धा केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही बाजूंनी युती आणि आघाडीत घटक पक्षांचे मेळावे घेणे, पदाधिकाऱ्यांशी संवाद करणे ह्या प्रक्रियेला जोर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिथे जिथे शक्य होईल, तिथे तिथे दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. ( Maval Lok Sabha Constituency Candidate Shrirang Barane And Sanjog Waghere Verbal Argument )

नुकतीच महायुतीची कासारवाडी येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बारणे यांनी, ‘माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे. हे मला माहीत नाही, उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला उमेदवार कळेल.’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून आता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘श्रीरंग बारणे यांचे विधान हे बालिशपणाचे असून 1987 सालापासून मी राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत आहे. आम्ही दोघेही एकाच मतदारसंघात राहत आहोत, तरी ते मला ओळखत नसतील तर तो त्यांचा अहंकार आहे.’ अशा शब्दात वाघेरे यांनी बारणेंचा समाचार घेतला. इतकेच नाही तर संजोग वाघेरे यांनी रावणाचे उदाहरण देत ‘रावणाचा देखील अहंकार जळून खाक झाला होता. रावणाची लंका शेवटी जळाली होती हे बारणेंनी विसरू नये. त्याचप्रमाणे श्रीरंग बारणेंच्या अहंकाराचा मतदार अंत करतील,’ असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना ‘संकल्प नशामुक्तीचा’ डोस, विद्यार्थ्यांवर राहणार ‘करडी’ नजर
– हुश्श..! अखेर लाईट आली, मुळशी तालुक्यातील 45 गावांचा वीज पुरवठा सुरळीत, महापारेषण आणि महावितरणचे शर्थीचे प्रयत्न
– दुःखद ! देहूरोड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू । Dehu Road News 


Previous Post

मावळ विधानसभेत महायुतीचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’, कामशेत येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न । Maval Lok Sabha

Next Post

‘महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर देखील कारवाई होईल’ – बाळा भेगडे । Maval Lok Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Lok Sabha Bala Bhegade

'महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर देखील कारवाई होईल' - बाळा भेगडे । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.