व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या

सध्याचे वाढते तापमान पाहता आवश्यकता नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणे, उन्हात फिरणे टाळावे असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 21, 2024
in मावळकट्टा, देश-विदेश, महाराष्ट्र
heatstroke sun heat

Photo Courtesy : File Image


सध्याचे वाढते तापमान पाहता आवश्यकता नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणे, उन्हात फिरणे टाळावे असा सल्ला डॉक्टर देत आहेत. अशा वातावरणात उष्माघात होऊ शकतो, म्हणून काळजी घ्यावी असे सांगितले जाते. परंतू, उष्माघात म्हणजे नक्की काय? उष्माघातापासून बचाव कसा करावा? लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींमध्ये उष्माघाताची लक्षणे कोणतही असतात? उष्माघातामुळे कुणाला त्रास होत असल्यास काय करावे? उन्हाळ्यात आहार कसा असावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उष्माघात –
“कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक.” उष्माघात ही शरीराची एक जीवघेणी अवस्था असल्याचे तज्ज्ञ सांगतात. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश अशा अन्य काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते. ( What is heatstroke Understand the causes and symptoms treatment first aid of heat stroke )

प्रौढ आणि लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे –
प्रौढांमध्ये उष्माघाताची लक्षणे :
– शरीराचे तापमान 104 फॅरन्हाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास,
– स्नायूंचे आखडणे,
– मळमळणे, उलटीचा भास होणे,
– चिंता वाटणे आणि चक्कर येणे,
– हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे
– लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे :
– आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे,
– लघवीचे कमी झालेले प्रमाण,
– शुष्क डोळे,
– कुठूनही रक्तस्त्राव होणे,
– तोंडाच्या येथील त्वचा कोरडी होणे.

उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीला अशी करा मदत –
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करताना पुढील गोष्टींचा अवलंब करावा :
– संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे,
– शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यावर छंड पाण्याचा मारा करावा,
– शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
“शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गंधळलेली, घाम येणे थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेस आल्यास त्वरित 108/102 या क्रमांकावर संपर्क करावा.”

उष्णतेच्या लाटेदरम्यान खाणं-पिणं आणि रहाणीमान कसे असावे?
– हलके अन्न खावे,
– फळे आणि सलाड सारखे पचायला हलके अन्न खावे,
– पुरेसे पाणी प्या,
– सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत,
– गॉगल/ छत्री/ टोपी/ बुट/ घालूनच घराबाहेर पडावे,
– प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्या जवळ बाळगावी,
– थंड पाण्याने अंघोळ करावी,
– घराबाहेर उपक्रम / मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घ्यावी.

अधिक वाचा –
– वडगावात मनसेकडून खळ्ळं खट्याक! ग्रामदैवताच्या मंदिराजवळील अवैध ताडी केंद्रावर चालवला बुलडोझर – पाहा व्हिडिओ
– पुणे जिल्हा : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाची कारवाई । Pune News
– धक्कादायक! तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक । Talegaon Dabhade


Previous Post

पाच हजार नागरिकांना घडविणार अयोध्या दर्शन, मोरया प्रतिष्ठानचा संकल्प, नावनोंदणी सुरु । Vadgaon Maval

Next Post

Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.