वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त, वडगाव नगरीचे माजी सरपंच कै. सोपानराव बाबुराव म्हाळसकर उर्फ आण्णा यांचे रविवारी (दि. 21 एप्रिल) दुःखद निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनावर वडगावच्या पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव च्या विकासात आणि पोटोबा देवस्थान च्या धार्मिक कार्यात सोपानराव म्हाळसकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या निधनावर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वारकरी संप्रदाय आदी सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सोपानराव आण्णा यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी ( दि. 27 एप्रिल ) वडगावात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ( all party tribute meeting organized today at vadgaon maval in memory of late sopanrao anna mhaiskar )
पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात शनिवारी सकाळी 10 वाजता या सर्वपक्षीय जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पोटोबा देवस्थान संस्थान, सर्व विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ वडगाव मावळ, अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका यांकडून ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलीये.
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मे महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– मावळचा ‘रणसंग्राम’ : मावळ लोकसभेसाठी 38 उमेदवारांकडून एकूण 50 नामनिर्देशन अर्ज दाखल, पाहा संपूर्ण यादी । Maval Lok Sabha
– श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळ्यात महायुतीचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा । Lonavala News