तळेगाव दाभाडे : डॉ. डी.वाय. पाटील फेडरेशन कॅम्पसमधील मान्यवरांच्या उपस्थितीत सीईओ ॲड. अनुजा पाटील यांचा जन्मदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी समाजाची सेवा करण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेला प्रत्यक्षात उतरवत विशेष रक्तदान शिबीर, “पृथ्वी वाचवा, भविष्य वाचवा” या विषयावरील पोस्टर सादरीकरण आणि विश्रामधाम तळेगाव दाभाडे या वृद्धाश्रमाला भेट आदी उपक्रम राबवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आव्हानात्मक काळात रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठ्याची सतत गरज असते, गरजूंना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे रक्ताचा पुरवठा झाला पाहिजे हे रक्तदान शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते. तसेच वृद्धाश्रमाला भेट देण्याचा उद्देश हा वृद्धांना फक्त आनंद आणि सोबत मिळवून देणे, तसेच समाजातील वृद्ध सदस्यांचा आदर करणे आणि त्यांचे समाजातील महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. ( Various social activities through DY Patil Technical Campus Talegaon Dabhade )
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 30 एप्रिल रोजी आयोजित TechTronix 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲड. अनुजा पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. हा उपक्रम राबवण्यात अध्यक्ष सुशांत पाटील यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले. प्राचार्य डॉ. सुरेश शिरबहादूरकर आणि विभागप्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या विशेष सहकार्याने सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक महेश पवार व आभार प्रदर्शन प्राध्यापक महेश लोहार यांनी केले.
अधिक वाचा –
– दुःखद ! गहुंजे येथे 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू । Maval News
– वारं फिरलं… आणि एकतर्फी वाटणारी मावळ लोकसभेची निवडणूक अखेर चुरशीची झाली ! Maval Lok Sabha
– ‘नशीब माझं, बारणे मला ओळखायला लागले’, प्रचाराची सांगता करताना संजोग वाघेरे यांची श्रीरंग बारणेंवर खोचक टीका