लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात आज (दि. 13 मे) मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळ लोकसभा अंतर्गत मावळ विधानसभेत 28.30 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी अजून वाढेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोकसभा निवडणूक 2024 – मावळ विधानसभा
33 मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 204 मावळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत होत असलेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे,
आज दिनांक 13 मे 2024 सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली. तेव्हापासून दुपारी 1 वाजेपर्यंत पुरुष – 64,852, स्त्रिया – 40,822 आणि इतर – 1 अशा नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 28.30 टक्के मतदान मावळ विधानसभा मतदारसंघ येथे झाले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 204 मावळ यांनी दिली. ( 28.30 percent polling till 1 pm in Maval Vidhansabha Constituency in Maval Lok Sabha )
सकाळी 11 पर्यंत 14.75 टक्के होती नोंद –
लोकसभा निवडणूक 2024 मधील 33 मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 204 मावळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत होत असलेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे,
सकाळी 9 वाजेपर्यंत –
पुरुष 8276 व स्त्रिया 4457 असे एकूण 12,733 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला सकाळी नऊ वाजेपर्यंत 3.41% मतदान झाले.
सकाळी 11 वाजेपर्यंत
महिला -19,953, पुरुष – 53,124, इतर – 1 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता, सकाली 11 पर्यंत एकूण 14.75 टक्के मतदान झाले होते.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्यांचे वाटप, मतदारसंघातील निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण । Maval Lok Sabha
– अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मतदान केंद्रांना भेट । Pune Lok Sabha Election
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News