व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुडन्यूज ! मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मिसिंग लिंक प्रकल्प

मुंबई ते पुणे दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. हजारो वाहने या मार्गावरून धावत असतात. मात्र यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा फटका बसतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 15, 2024
in लोकल
Mumbai Pune missing link project

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुंबई ते पुणे दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. हजारो वाहने या मार्गावरून धावत असतात. मात्र यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा फटका बसतो. वेळ वाया जातो. मुंबई पुणे प्रवास करत असताना वाहनांना लोणावळा खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. लोणावळा, खंडाला ही पर्यटन स्थळे असल्याने शनिवारी, रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तेव्हा तर वाहतूक कोंडी कित्येक तास फुटत नाही. प्रवाशांचे होणारे हाल, अनावश्यक वाहतूक कोंडी आणि वेळेचा होणारा अपव्यय, हे पाहता सरकारने मुंबई – पुणे मार्गावर मिसिंग लिंक हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरु केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुंबई – पुणे मार्गावर अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. लोणावळा घाटातील वाहतूक कोंडी फुटावी त्यासाठी मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कूसगाव पर्यंत दुहेरी बोगदा तयार केला जात आहे. दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गीकेचे बोगदे तयार होणार आहेत. त्यातील एका बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर एवढी आहे. तसेच एका बोगद्याची लांबी 1.67 किलोमीटर एवढी आहे. विशेष बाब अशी की, या दोन्ही बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

बोगद्यांचे 98 टक्के इतके काम पूर्ण झाले असून आता फक्त बोगद्याच्या अंतर्गत भागातील यंत्रणेची कामे बाकी आहेत. ही कामे जलद गतीने सुरू आहेत. विशेष म्हणजे या बोगद्यांची जोडणी मुंबई पुणे एक्सप्रेस वेला देण्यासाठी खोपोलीच्या दिशेने दोन पुलांची उभारणी केली जात आहे. यातील 1.8 किलोमीटर लांबीचा पूल पूर्ण झालाय, तर 950 मीटर लांबीच्या केबल स्टेड प्रकारातील पुलाचे काम सध्या सुरू आहे. या पुलाचे 60 ते 65 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत राहिलेले काम पूर्ण होणार आहे.

बोगद्याचे आणि पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होणार असा दावा करण्यात आला आहे. ( mumbai to pune travel time cut by 25 minutes by missing link project will complete before december )

अधिक वाचा –
– मोदींचा सत्कार करताना जिरेटोप भेट, ‘छत्रपतींचा जिरेटोप चढवला आता सिंहासनावरही बसवणार का?’, महाराष्ट्रात संतापाची लाट – Video
– शिलाटणे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ, कार्ल्यात चारचाकी वाहनाचे झाले नुकसान
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना कला गौरव पुरस्कार

Next Post

संजोग वाघेरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ! बारणेंना फक्त ‘इथेच’ लीड मिळेल, पण आपला विजय ‘इतक्या’ लीडने होणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog-Waghere

संजोग वाघेरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ! बारणेंना फक्त 'इथेच' लीड मिळेल, पण आपला विजय 'इतक्या' लीडने होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.