Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर अपघातात अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झालाय, तसेच त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचाही मृत्यू झाला आहे. इराण देशासाठी हा मोठा धक्का मानला जात असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही तासांपासून ईब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता होते, त्याचा शोध घ्यायला गेलेल्या पथकाने अपघाताची पुष्टी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
इराणच्या प्रेस टीव्हीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली असून त्यांना त्या ठिकाणी कुणीही जिवंत असल्याचे आढळून आले नाही, असे म्हटले आहे. ( Iran president helicopter crash Ebrahim Raisi and foreign minister have died )
Iran’s Press TV tweets, “Rescue teams identify President Ebrahim Raisi’s crashed chopper…No clue of any living persons in President Raeisi’s search following Sunday chopper crash.”
— ANI (@ANI) May 20, 2024
अध्यक्ष इब्राहिम रईसी हे अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटनासाठी गेले होते. उद्घाटनानंतर ते माघारी हेलिकॉप्टरमधून परत निघाले. तेव्हा त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चित स्थळी पोहोचले. परंतू तिसरे हेलिकॉप्टर पोहचले नाही.
हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर 30 मिनिटात त्याचा संपर्क तुटला होता. प्रयत्न केल्यानंतरही हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. हेलिकॉप्टरच्या शोधार्थ बचाव पथक रवाना झाले. पथकाकडून 16 तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. त्यानंतर पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले.
या दुर्घटनेत अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला. इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी 1 वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता झाला होता. जगभरातून या घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
Deeply saddened and shocked by the tragic demise of Dr. Seyed Ebrahim Raisi, President of the Islamic Republic of Iran. His contribution to strengthening India-Iran bilateral relationship will always be remembered. My heartfelt condolences to his family and the people of Iran.…
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2024
अधिक वाचा –
– आंदर मावळात विजेचा लपंडाव सुरुच ! नागरिक प्रचंड हैराण, एका अवकाळीने महावितरणला 440 व्होल्टचा झटका
– दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News
– वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब काळे यांचा चिठ्ठीवर विजय !