अवकाळी पावसावेळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वडगाव मावळ शहरातील अनेक ठिकाणच्या हायमास्ट दिव्यांची पडझड झाली. यामुळे शहरातील अनेक भागातील विजपुरवठा देखील बाधित झाला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबत आता नगरपंचायत प्रशासनाला निवदेन देण्यात आले आहे. वडगांव शहरातील हायमास्ट दिवे पडझडीची दुरूस्ती करुन भविष्यात जिवितहानी होऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच हायमास्ट दिव्यांची चौकशी करावी, असे निवदेन शहर राष्ट्रवादीकडून मुख्यधिकारी प्रविण निकम यांना देण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष प्रविण ढोरे, माजी नगरसेवक सुनिल ढोरे, गणेश म्हाळसकर, मंगेश खैरे, युवक अध्यक्ष अतुल ढोरे, शरद ढोरे, किरण ढोरे, विशाल चव्हाण, मयुर गुरव, हर्षल ढोरे, चेतन चव्हाण, पवन ढोरे, रवि ढोरे, विकी ढोरे आदी उपस्थित होते. ( Highmast lights fall during unseasonal rains Vadgaon NCP Letter to Nagar Panchayat administration )
अधिक वाचा –
– घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News
– आंदर मावळात विजेचा लपंडाव सुरुच ! नागरिक प्रचंड हैराण, एका अवकाळीने महावितरणला 440 व्होल्टचा झटका
– दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News