देहुरोड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 279/2024 भा.द.वि. कलम 307, 324, 504, 506, 34 आर्म अॅक्ट 4 (25) (27) प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्ह्यातील आरोपी दीपक दत्तात्रय शेलार (वय 33 वर्षे रा. देहूगांव) याला अटक केली होती, परंतू त्याचे साथीदार फरार होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अटक आरोपीच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी एक पथक तयार केले होते. या पथकाने केलेल्या तपासात फरार आरोपी हे अंबरनाथ, कल्याण, ठाणे, घाटकोपर, मुंबई पुणे अशा ठिकाणी सतत ठिकाण बदलून लपून राहत होते, असे समजले. त्यामुळे त्यांना पकडणे तसे मुश्कील होते. ( Dehu Road Police arrested accused who absconded with attempted murder )
परंतू हे आरोपी देहूगाव भागात आले असता पोलिसांनी योग्य पाऊल उचलले, आणि पथकाने अथक प्रयत्नांतून या आरोपींना देहूगांव येथील विठ्ठलवाडीच्या डोंगराळ भागातून ताब्यात घेऊन अटक केली. यात आरोपी कुंदन संदिप थोरात (वय 25 वर्षे), अनिकेत संतोष विटकर (वय 19 वर्षे), रोहन दुंदा चिमटे (वय 21 वर्षे) तिघेरी राहणार देहुगांव (ता. हवेली) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यात अटक केली. आरोपींना कोर्टाने 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली असून देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव, मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी केली.
अधिक वाचा –
– धामणे गावात घरफोडी, पाऊणे नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास । Maval Crime
– मावळात पुन्हा बारणेच ? एक्झिट पोलच्या निकालाने महाविकासआघाडीच्या गोटात शांतता, शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला । Maval Lok Sabha Constituency
– मावळमध्ये ‘हिट अँड रन’चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले