व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वसुंधरेला समृद्ध करण्याचा वसा घेतलेले रघुनाथ ढोले ! जागतिक पर्यावरण दिन निमित्त वाचा विशेष लेख । World Environment Day

'वृक्ष लागवड आणि संवर्धन' हेच काकांचं जीवनव्रत आहे. गेली ३८ वर्षे काकांनी त्याचं व्रत जोपासलं आहे. वसुंधरेला समृद्ध करणारे हे काका म्हणजे पुण्यातील रघुनाथ ढोले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Devrai Foundation Raghunath Dhole Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे, (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : लहानपणापासून वडीलांना शेतीच्या कामात मदत करताना माती, झाडं आणि निसर्गाशीच काकांची घट्ट मैत्री झाली. धरित्रीची अगदी आई-वडिलांसारखीच सेवा करण्याचे संस्कार मनात रुजले अन् निसर्गसेवा काकांच्या हातून मनोभावे होत गेली. ‘वृक्ष लागवड आणि संवर्धन’ हेच काकांचं जीवनव्रत आहे. गेली ३८ वर्षे काकांनी त्याचं व्रत जोपासलं आहे. वसुंधरेला समृद्ध करणारे हे काका म्हणजे पुण्यातील रघुनाथ ढोले (वय ६८).

(World Environment Day) रघुनाथकाका पुण्यातील घोरपडीला लहानपणापासूनच स्थायिक आहेत. त्याचं शालेय शिक्षण त्या परिसरातच झालं. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी एम. एससी. (फिजिकल केमिस्ट्री) पदवी पूर्ण केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रघुनाथकाकांचे वडील घोरपडीतील लष्कराच्या जमिनीवर शेती करायचे. अभ्यास करुन काका वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचे. त्यामुळं लहान वयातच झाडांबद्दल प्रेम निर्माण झालं, झाडांचं महत्व समजल होतं. महाविद्यालयीन शिक्षणानंतर काकांना पुण्यात forensic Science Laboratory मध्ये नोकरी लागली. गॅझेटेड ऑफिसर पदावर काका २० वर्ष कार्यरत राहिले. आपल्या अतिशय आवडीचं वृक्षसंवर्धनाचं काम करण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि निसर्गसेवेला वाहून घेतलं. त्यासाठी विविध प्रशिक्षणं घेतली. गार्डन डेव्हलपमेन्टचा व्यवसाय सुरु केला. काकांच्या कुटुंबियांनी निसर्गसेवेत त्यांच्या बरोबरीनं सहभाग घेतला आहे.

थेऊरला चार एकर जमीन घेऊन तिथं काकांनी ‘देवराई’ ही सुंदर नर्सरी साकारली आहे. या देवराईमध्ये काकांनी विविध झाडांच्या बीयांचं संकलन केलं आहे, आजवर देशी झाडांची लाखो रोपं तयार करुन त्याचं राज्यभरात वाटप केलं आहे. संतुलित पर्यावरणासाठी वृक्षसंवर्धन अतिशय महत्वाचं असल्यानं ‘मागेल त्याला रोप’ ही त्यांची कार्यपद्धती आहे.

वृक्षलागवड आणि संवर्धनाचं काम अखंड सुरू राहावं या उद्देशानं काकांनी ११ वर्षापूर्वी देवराई फाऊंडेशनची स्थापना केली. फाऊंडेशनने आजवर सुमारे ३० लाख रोपांची लागवड आणि वाटप केले आहे. पर्यावरणात हिरवाई फुलवण्यासाठी हजारो लोक फाऊंडेशनशी जोडले गेले आहेत. झाड लावणारया प्रत्येक व्यक्तीला काका देवराई फाऊंडेशनचं सदस्य मानतात. फाऊंडेशनच्या कामानिमित्त २०-२५ कामगारांना थेऊरच्या नर्सरीत रोजगारही मिळाला आहे.

  • देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं जंगल जे हजारो वर्ष कोणीही तोडत नाही; अशी देवराईची व्याख्या काकांनी सांगितली. देवराई फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि गुजरात, भोपाळ, बेंगलोर, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात अडीचशेहून अधिक देवराई विकसित करण्यात आल्या आहेत. फाऊंडेशनकडून वेळोवेळी भेट देऊन तसंच स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊन देवराईच्या संगोपनाची माहिती घेतली जाते. या सर्व देवराईंचे संगोपनही चांगल्या प्रकारे होत आहे.

वृक्षारोपणाविषयीचं सर्व मार्गदर्शन व मदत आपल्याला देवराई फाऊंडेशनकडून मिळते. अनेक संस्था, शाळांनी फाऊंडेशनच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. ( World Environment Day Special Interview with Devrai Foundation Raghunath Dhole Pune )

वृक्षसंवर्धनाच्या या अनमोल कार्यासाठी राज्यशासनाने वनश्री पुरस्काराने काकांना गौरविलं आहे. इतरही अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलं आहे. गेली ३८ वर्षे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा विचार रघुनाथकाका कृतीतून जगत आहेत.

‘ज्या झाडांवर प्राणी, पक्षी, मधमाशा, किडे, मुंग्या जगतात अशी सर्व झाडं लावली पाहिजेत. घरातील कुंडीतही फुलझाडं, गवतीचहा, कढीपत्ता ही झाडं लावावीत. ग्रामीण भाग असो किंवा शहरी झाडं लावायला भरपूर जागा आहे. आपण जागा शोधली की सापडते. नागरिकांमध्ये झाडं लावणयाचं प्रमाण आता वाढत आहे. ही जनजागृती हेच आमच्या वृक्षसंवर्धनाच्या चळवळीचं यश आहे.’ – रघुनाथकाका

अधिक वाचा –
– मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?

Next Post

‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Lok Sabha Result 2024 Shiv Sena Shrirang Barane win

'दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय', वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.