जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन” या अभिनव उपक्रमाची सुरुवात पवना शिक्षण संकुलात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांच्यासह सर्व शिक्षक व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलतील प्राथमिक, माध्यमिक शाळा , ज्युनिअर कॉलेज, इंजिनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जागृकता निर्माण होण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संस्थेने यावर्षी प्रत्येक शाळेतील, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष’ लागवड करावी तसेच वृक्षसंवर्धन करावे. यासाठी संस्था या वर्षी प्रथमच प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी एक झाड देणार असून त्या विद्यार्थ्यानी ते झाड आपल्या घराच्या अंगणात, शेतात अथवा आपल्या शाळेत लावावे व त्याचे वृक्षसंवर्धन वर्षभर करावे. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन केल्यानंतर वर्ष अखेरीस त्याला संस्थेच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ( Initiation of One Student One Tree Planting initiative at Pavana Education Complex Pavananagar )
संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलातील सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असून संस्था या सर्वांना मोफत देशी आणि पर्यावरणात उपयुक्त महत्वाची अशी रोपे देणार आहे. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, सध्या जगात उष्णतेचा उच्चांक गाठला असून ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा पूर्णपणे समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे काळाची गरज झाली त्यासाठी संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
यावेळी बोलताना सोनबा गोपाळे म्हणाले की, शालेय जीवनापासूनच पर्यावरण रक्षण संवर्धन विद्यार्थ्यांवर होण्यासाठी संस्थेच्या वतीने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांना दिलेली रोपे – त्याची लागवड – संवर्धन यासाठी शाळा पातळीवर सक्षम समिती स्थापन करून त्यांना मार्गदर्शन आणि सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
“ कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी ”
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक संस्थेने “ कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी ” हा पर्यावरण पुरक उपक्रम मागील शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आलेला आहे. प्लॅस्टिक मुक्ती करण्यासाठी संस्था संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कुल,अभियांत्रिकी महाविद्यालय मधील एकूण ९,००० विद्यार्थ्यांस व कर्मचारी यांना कापडी पिशवी प्रदान करण्यात आल्या आहेत. यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी. सी., श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे तसेच मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत या सामाजिक शैक्षणिक व सहकार संस्थांनी आमच्या संस्थेस बहुमोल असे सहकार्य केले.
अधिक वाचा –
– कौतूकास्पद ! तळेगाव नगरपरिषदेकडून एकाच दिवशी तब्बल 200 झाडांची लागवड, जागतिक पर्यावरण दिनी राबवला उपक्रम । Talegaon Dabhade
– वडगाव नगरपंचायतीकडून ओढे-नाले यांची साफसफाई, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न होणार पूर्ण, खासदार श्रीरंग बारणे यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास पक्के (रिपोर्ट)

