व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सर्वसामान्यांच्या लेकरांना पत्रकारितेचे धडे देणारा महानायक गेला ! रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचे निधन

चित्रपट जगताचे बादशाह, पत्रकारितेच्या दुनियेतील महानायक, रामोजी समुहाचे चेअरमन रामोजी राव यांनी वयाच्या 87 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2024
in देश-विदेश, मावळकट्टा
Ramoji Film City founder Ramoji Rao

Photo Courtesy : X / G Kishan Reddy


चित्रपट जगताचे बादशाह, पत्रकारितेच्या दुनियेतील महानायक, रामोजी समुहाचे चेअरमन रामोजी राव यांनी वयाच्या 87 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी (8 जून) पहाटेच्या 3.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे ते मालक होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व होते. 2016 मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रामोजी राव हे भारतीय चित्रपट निर्माते आणि उषाकिरण मुव्हीज प्रोडक्शन कंपनीचे प्रमुख होते. ‘चेरुकुरी रामोजी राव’ या नावानेही ते प्रसिद्ध होते. जगातील सर्वात मोठे फिल्म प्रोडक्शन रामोजी फिल्म सिटीचे ते मालक होते. सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. ( Eenadu & Ramoji Film City founder Ramoji Rao passed away in Hyderabad Telangana )

पत्रकारिता क्षेत्रात न विसरता येणारे योगदान –
रामोजी राव यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान न विसरता येणारे आहे. गरिब कुटुंबातील सर्वसामान्यांच्या लेकरांना पत्रकारितेत आणून पत्रकारितेचा चेहरा मोहरा बदलणारे रामोजीराव हे खऱ्या अर्थाने पत्रकारितेचे महानायक होते. ईनाडू ईटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी 24 तास न्यूज देणारे चॅनेल ही संकल्पना सर्वप्रथम आमलात आणली. आजही हैद्राबाद येथे ईटीव्ही भारत या संस्थेतून शेकडो तरूण पत्रकारिता शिकून, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन माध्यम क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहेत. रामोजीराव हे खऱ्या अर्थाने पत्रकारितेला माणसात आणणारे महामानव होते.

Eenadu & Ramoji Film City founder Ramoji Rao, passed away today morning in Hyderabad, Telangana.

Ramoji Rao died while undergoing treatment at Star Hospital in Hyderabad. He took his last breath at 3:45 am. pic.twitter.com/DJGufYRtMP

— ANI (@ANI) June 8, 2024

पत्रकारितेला माणसात आणणारा महानायक गेला !
“भारतातील बहुभाषिक माध्यम विश्वाला आकार देणारे ई टीव्ही नेटवर्क आणि रामोजी समुहाचे सर्वेसर्वा रामोजी राव यांनी आज शनिवारी पहाटे जगाचा निरोप घेतला. ते 87 वर्षाचे होते. भारतातील सिने उद्योग आणि माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा आणण्यात ते अग्रेसर होते. म्हणून रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात. ते रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे संस्थापक होते. देशाच्या ग्रामीण भागातील, गोरगरीब घरातील हजारो पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणून त्यांनी ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्न माध्यमांच्या व्यासपीठावर ठळकपणे मांडले. गाव खेड्यातील बातमीदाराला फक्त मान न देता, मानधन देण्याची प्रथा सुरू करणारे आणि स्ट्रिंगर नेटवर्कला महत्त्व देणारे ते पाहिले दूरदृष्टी दाखवणारे व्यक्तिमत्त्व होते.
लोकशाही सुदृढ करण्याच्या त्यांच्या या अलौकिक कामगिरीसाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. गेल्या 40 वर्षांपासून अनेक चांगले पत्रकार घडवून एक नवे प्रबोधन पर्व सुरू करणारे रामोजी राव त्यांच्या अफाट योगदानामुळे कायम लक्षात राहतील. असंख्य वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलना लोकाभिमुख करणाऱ्या या माध्यमविश्वाच्या महानायकास भावपूर्ण श्रद्धांजली !” – महेश म्हात्रे (वरीष्ठ पत्रकार यांची फेसबूक पोस्ट)

Telangana BJP chief and party MP G Kishan Reddy condoles the demise of Eenadu & Ramoji Film City founder Ramoji Rao. pic.twitter.com/LvwfF1rBE7

— ANI (@ANI) June 8, 2024

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी
– लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी मालकांचे धाबे दणाणले ! IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई
– पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election


Previous Post

कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

आमदार सुनिल शेळके यांचा एल्गार ! सोमाटणे टोलनाक्यावर मावळवासियांची होणारी लूट थांबवण्यासाठी स्वतः उतरणार मैदानात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla-sunil-shelke

आमदार सुनिल शेळके यांचा एल्गार ! सोमाटणे टोलनाक्यावर मावळवासियांची होणारी लूट थांबवण्यासाठी स्वतः उतरणार मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chakan To avoid traffic congestion immediately construct roads in area after removing encroachments Ajit Pawar

चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

August 8, 2025
Narali-Poornima

“सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? । वाचा नारळी पौर्णिमा विशेष लेख

August 8, 2025
dog

भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी, वडगाव येथील घटना, स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण । Vadgaon Maval

August 8, 2025
Health services in Maval new facilities approved for Vadgaon Kanhe Lonavala Sub-District Hospitals

मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

August 8, 2025
Reforms under Employment Guarantee Scheme Meeting concluded under chairmanship of MLA Sunil Shelke

‘मनरेगा’ योजनेंतर्गत सुधारणा, नव्या उपक्रमांची आखणी ; आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न

August 6, 2025
Blood-Donation-Camp

तळेगावमध्ये १० ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन । Talegaon Dabhade

August 6, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.