व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ज्यांनी मते दिली त्यांचा आणि नाही दिली त्यांच्यासह सर्वांचा मी लोकप्रतिनिधी.. कसलाही दुजाभाव करणार नाही’ – खासदार श्रीरंग बारणे

'देशहितासाठी आणि देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांची ही निवडणूक नव्हती, तर अपप्रचार करणाऱ्यांची ही निवडणूक होती.' - खासदार श्रीरंग बारणे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 22, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
MP Shrirang Appa Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘देशहितासाठी आणि देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांची ही निवडणूक नव्हती, तर अपप्रचार करणाऱ्यांची ही निवडणूक होती. समाजात अस्थिरता निर्माण करण्याचे आणि फूटीरतेची भावना पेरण्याचे काम विरोधी पक्षाने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात केले. तसेच एनडीए 400 पार गेल्यास संविधान बदलले जाणार हा अपप्रचार मतदारांमध्ये पसरवण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला. त्यामुळे एनडीए आघाडीला अपेक्षित यश नाही,’ असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लोणावळा शहरात आल्यावर खासदार श्रीरंग बारणे यांचा महायुतीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लोणावळा माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, भाजपाचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय भोईर, मनसेचे शहराध्यक्ष भरत चिकणे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्यासह महायुतीचे अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( MP Shrirang Appa Barane was felicitated in Lonavala )

‘मावळ मतदारसंघात आजवर स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी आणण्याचं काम मी केलं आहे. पण आम्ही त्याचं भांडवल कधी केले नाही. सातत्याने खोटं नाट सांगितले तर ते सामान्य माणसाला खरं वाटत आणि तेच विरोधी पक्षाने आणि विरोधी उमेदवाराने माझ्याबाबतीत केले. माझ्या विरोधी उमेदवाराने त्यांच्या स्वतःच्या प्रभागात आजवर किमान एक तरी काम केलं का? मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो. ही माझी कार्यपद्धती आहे,’ असे बारणेंनी मनोगतादरम्यान सांगितले.

‘लोकसभेची निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते. मतदारसंघ खूप मोठा असल्याने निवडणूक काळात मला सर्व ठिकाणी पोहोचता आलं नाही. पण महायुतीच्या कार्यकर्त्यांनी योग्य काम केले. त्यामुळेच माझा विजय सुकर झाल्याचे बारणे यांनी सांगितले. ज्यांनी मतं दिली त्यांचाही आणि ज्यांनी मतं नाही दिली त्यांच्यासह मी सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे. मी सर्वांची काम करण्याकरिता निवडून आलो असून कोणामध्येही कसलाही दुजाभाव करणार नाही,’ असा विश्वास बारणेंनी दिला.

‘मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी देखील प्रामाणिक काम केलं. माझ्यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि हे सर्वांना माहीत आहे. मतदारांच्या डोक्यात विष पेरण्याचे काम विरोधी पक्षांनी केली. पण मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला, 48 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मला मतदान केले,’ असेही बारणे म्हणाले.

अधिक वाचा –
– इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक
– हुश्श… ! मान्सून सरी बरसल्याने पवना धरणातील जलसाठा स्थिर होण्यास मदत, शुक्रवारी 55 मी.मी. पाऊस । Pavana Dam Updates
– मोठी बातमी ! देशात पेपर लीक विरोधी कायदा लागू ; 10 वर्षे कारावास, 1 कोटी दंडाची तरतूद, वाचा सविस्तर


Previous Post

शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ; वाचा योजनेची उद्दिष्ट्ये, वैशिष्ट्ये आणि जोखमीच्या बाबी

Next Post

कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Warkari felicitated maval

कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; 'वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.