पवन मावळ भागातील महागाव, सावंतवाडी आणि मालेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एकूण 50 विद्यार्थ्यांना ‘खुशी के रंग’ फाऊंडेशन आणि ‘स्पंदन’ फाउंडेशन यांच्या माध्यामातून मोफत स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. या कीटमध्ये दप्तर, वह्या, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाउच इ. साहित्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि. 22) फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत हे वाटप झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुलांना अशा विविध संस्थानी वेळोवेळी मदतीचा हात दिल्यास मुलांमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असे मत महागाव शाळेचे आदर्श शिक्षक धोंडिबा घारे यांनी व्यक्त केले. खुशी के रंग फाऊंडेशन मार्फत राज्यभर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अशाप्रकारची मदत करण्याचे काम गेली 8 वर्षे अविरतपणे सुरू आहे. त्यापैकी मागील दोन वर्षात कोटमवाडी, कोथुर्णे येथील वाघजाई वाडी आणि चिंचवाडी या शाळांना देखील अशाच प्रकारची मदत केली गेली होती. ( Distribution of school kit to needy students by Spandan and Khushi Ke Rang Foundation )
‘एक कदम कलम से कलाम की ओर’
आम्हाला भविष्यात अनेक ए. पी. जे. अब्दुल कलाम घडवायचे आहेत आणि म्हणुनच त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ‘एक कदम कलम से कलाम की ओर’ असा उपक्रम हाती घेतल्याचे खुशी के रंग फाऊंडेशनचे निलेश शिंगे यांनी सांगितले. या मुलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून सर्वांनी योग्य ठिकाणी मदत झाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी निलेश शिंगे,अर्णव शिंगे, अनिरुद्ध, स्पंदन फांउडेशन चे संस्थापक धर्मेंद्र ठाकर, आदर्श शिक्षक धोंडिबा घारे, शिक्षिका कुमुदिनी जगताप, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मरगळे, सावंतवाडी ग्रामविकास मंचाचे अध्यक्ष भगवान सावंत व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार
– कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’
– ‘ज्यांनी मते दिली त्यांचा आणि नाही दिली त्यांच्यासह सर्वांचा मी लोकप्रतिनिधी.. कसलाही दुजाभाव करणार नाही’ – खासदार श्रीरंग बारणे