व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला – भाजे लेणी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, आयएनएस शिवाजी आदी ठिकाणी कैवल्यधाम योग संस्थेमार्फत योग प्रशिक्षण शिबिर

लोणावळा येथील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (दिनांक 21 जून) मोठ्या उत्साहात साजरा केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 23, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
International Yoga Day Celebrated By Kaivalyadham Yoga Sanstha

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा येथील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (दिनांक 21 जून) मोठ्या उत्साहात साजरा केला. संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील वेगवेगळ्या संस्था, शाळा तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने विविध पर्यटनस्थळ आदी ठिकाणी योग प्रशिक्षण वर्गाचे विशेष आयोजन केले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कैवल्यधाम योग संस्थेमध्ये योग दिवसाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. तदनंतर प्रमुख पाहुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष, वकील राजेंद्र उमप, कैवल्यधाम योग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बंदिता सतपते, ब्रिगेडियर (निवृत्त) सुहास धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सकाळी 8.45 ते 9.30 वाजेपर्यंत योगा प्रोटोकॉल प्रमाणे कैवल्यधाम संस्थेच्या योगाचार्या श्रीमती संध्या दीक्षित यांनी योग प्रशिक्षण घेतले. ( 10th International Yoga Day Celebrated By Kaivalyadham Yoga Sanstha Lonavla )

याशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील कार्ला लेणी व भाजे लेणी, एमटीडीसी कार्ला, देहूरोड कैनटोनमेंट, लोणावळ्यातील एल अँड टी प्रशिक्षण केंद्र, आयएनएस शिवाजी येथे कैवल्यधाम संस्थेतर्फे योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. भाजे लेणी येथे संपर्क बालग्राम, भाजे येतील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच कैवल्य विद्या निकेतन शाळा, कैवल्यधाम यांनी लोणावळ्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण वर्गाचे विशेष आयोजन केले होते.

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच लोणावळ्यातील वकील संजय गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योग प्रशिक्षिका कुमारी ममता बिष्ट यांनी केले आणि आभार प्रदर्शन वकील संजय गायकवाड यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी केले होते.

अधिक वाचा –
– ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, सरकारच्या आश्वासनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
– मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार
– कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’


Previous Post

‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनच्या माध्यमातून महागाव, सावंतवाडी, मालेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप

Next Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 22 कोटींची विकासकामे…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehurod Cantonment Board

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 22 कोटींची विकासकामे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.