व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News

मावळ तालुका हा भागाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मावळच्या सुवासिक इंद्रायणी तांदळाची चव जगभरात प्रसिद्ध आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Rice cultivation started Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका हा भागाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मावळच्या सुवासिक इंद्रायणी तांदळाची चव जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या मान्सून सुरू झाला आहे. मावळ तालुक्यात शेतशिवारात भाताची रोपे तरारताना दिसत आहेत. सोबतच कृषि विभागाने राबवलेल्या खास ‘कृषि संजिवनी मोहिमे’अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी खुप अगोदरच भाताची पेरणी केली होती, त्यांच्या शेतात भाताची रोपे चांगलीच वाढली असून शेतकऱ्यांनी भात लागवड देखील सुरू केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवन मावळ भागातील मौजे येळसे गावातील प्रगतशील शेतकरी रमेश आडकर यांच्या शेतात सध्या भात लागवड सुरू आहे. कृषी विभागाच्या कृषी संजिवनी मोहिमेअंतर्गत येळसे गावातील शेतकऱ्यांना भात लागवडीबाबत आधुनिक पद्धतीची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनाची वाट न पाहता पेरणी करून बाह्य पाणीपुरवठा करून भाताची रोपे वाढवली. ही रोपे आता चांगलीच वाढली असून पाणीपुरवठा करून शेतकरी भात लागवड करत आहेत. आता कोसळणारा मान्सून हा अशा शेतकऱ्यांच्या भातपिकाला अधिक फायदेशीर ठरतो, असे शेतकरी सांगतात. ( Rice cultivation started in Yelse village success of agriculture revival campaign Maval Taluka )

भात लागवड सुरू असतानाच कृषि सहाय्यक विकास गोसावी, मंडळ कृषी अधिकारी काळेकॉलनी प्रशांत डहाळे आणि कृषी पर्यवेक्षक नागनाथ शिंदे यांनी भातशिवारात भेट दिली. सुयोग्य पद्धतीने लागवड सुरू असल्याचे निश्चित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

‘मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात लागवड करतात. परंतू अधिकाधिक शेतकरी पारंपारिक पद्धतीने भात लागवड करण्यास प्राधान्य देत होते. कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून भात उत्पदनाच्या आधुनिक पद्धतीचा प्रसार करण्यात आला आहे,’ अशी माहिती कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी दिली.

अधिक वाचा –
– 1972 साली धरण झाले, 7 आमदार झाले, मात्र पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागायला 2024 साल उजाडले । Pavana Dam
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade


Previous Post

‘आम्ही इथले भाई…’ असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime

Next Post

‘I Nilesh Lanke..’ कमालच झाली ! निलेश लंकेंनी थेट इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, सुजय विखेंना कृतीतून प्रत्युत्तर – पाहा Video

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nilesh Lanke Took oath In English In Parliament

'I Nilesh Lanke..' कमालच झाली ! निलेश लंकेंनी थेट इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, सुजय विखेंना कृतीतून प्रत्युत्तर - पाहा Video

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.