रविवारी (दि. 30 जून) लोणावळ्यातील जगप्रसिद्ध भुशी धरण भरले, ओव्हरफ्लो झाले. आणि हा हा म्हणता आख्ख्या राज्याला याची खबर काही तासात कळली. पावसाळा आणि लोणावळा यांचं एक अतुट नातं आहे. लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. तर जवळील मुंबई पुणे शहरातील नागरिकांसाठी ही तर पावसाळी पर्यटनाची पंढरीच आहे. त्यामुळे जेव्हा धरण भरले आणि मान्सूनचा जोर वाढला तेव्हा मावळ तालुक्यातील नागरिकही बऱ्यापैकी खुश झाले. कारण आता पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओढा मावळाकडे वाढणार आणि त्यातून चार रुपये कुटुंबाला मिळणार, या विचारात अनेक जण होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
परंतू… परंतू या सगळ्या विचाराच्या आड आली ती भुशी डॅमची दुर्घटना. रविवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान भुशी डॅम भरले आणि त्याच भुशी डॅमच्या मागील बाजूस असलेल्या एका धबधब्याखाली पुण्यातील एका कुटुंबातील अनेकजण वाहून गेले. पर्यटक वाहून गेले, हा त्या पर्यटकांचा आतातायीपणा होता. त्याचे पुरावे म्हणजे व्हारल होणारे व्हिडिओ आहेतच. परंतु या दुर्घटनेने लोणावळ्याच्या पावसाळी पर्यटनाला गालबोट लागले. असे व्हायला नको होते. लोणावळा शहर पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. येथील स्थानिक व्यावसायिक, नागरिक, पोलिस प्रशासन, नगरपालिका प्रशासन सर्वजण पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सेवासुविधा मिळाव्यात यासाठी सतत काम करत असतात, परंतु अशा काही दुर्घटना घडतात आणि त्यामुळे पर्यटनस्थळाचे नाव खराब होते. ( Lonavala Monsoon Tourism Bhushi Dam Tourist Management )
लोणावळ्यात एक ना अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटक येथे येतात. त्यांच्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासन खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना करतात. परंतु पर्यटक याकडे कानाडोळा करतात, त्यातून अपघात घडतात. परिणामी जेव्हा जिवितहानी होते, तेव्हा ठळकपणे ठिकाणाचे नाव समोर येते. रविवारच्या दुर्घटनेत लोणावळा शहर आणि येथील पावसाळी पर्यटनाला गालबोट लागले. परंतू लोणावळा शहर असे बिलकून नाही, ना मावळ तालुका असा आहे. इथे यावं निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा, खावं मजा करावी आणि घरी जावं, इतकं सोप्प पर्यटन आहे. परंतु अनावश्यक डेरिंग आणि आतातायीपणा करून काही पर्यटक आपला जीव गमावतात, आणि बदनाम होतात ती पर्यटनस्थळे.
अधिक वाचा –
– माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन
– वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…