व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्या, आता अर्ज करणे झाले सोपे, वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 3, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: मंगळवारी (दि. 2) विधानसभेत केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून अधिकाधिक महिलांना सहजसुलभपणे योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती. ती 2 महिने करण्यात आली असून दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. 1 जुलै, 2024 पासून दरमहा रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Know About Scheme terms & conditions application process in details )

या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. रुपये अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा –
– ही बातमी वाचा मगच लोणावळ्यात जा, ‘ती’ दुर्घटना झाली आणि सगळंच बदललं ! पर्यटनाचे नवीन नियम लागू, ‘इथे’ थेट ‘नो-एन्ट्री’
– ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी पैसे मागितले तर मला सांगा, कुणालाही पैसे देऊ नका – आमदार सुनिल शेळके
– राजकीय पुनर्वसन, जातीय समीकरण, मतांची गोळाबेरीज.. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर

 


Previous Post

इंद्रायणी नदीवरील पूल, नवीन मतदार यादी, लाडकी बहीण योजना यांबाबत रवींद्र भेगडे यांचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval

Next Post

वडगाव नगरपंचायतीत सफाई कर्मचारी क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायतीत सफाई कर्मचारी क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.