व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 14, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News

कार्ला एमटीडीसी येथे ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. यात सातही विश्वस्थांनी दोघांना एकमताने मतदान केले. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी महाराष्ट्रातून दोन भाविकांची निवड करण्यात येणार होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 6, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Karla News Shri Ekvira Devasthan Trust

Photo Courtesy : Team Dainik Maval


Karla News Shri Ekvira Devasthan Trust Election : आग्री-कोळी बांधवांची कुलदैवता आणि राज्यासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई श्री एकविरा मातेच्या श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदी महाराष्ट्रातील भाविकांमधून दोन जणांची निवड करायची होती. त्यासाठीची निवड प्रक्रिया आज, शनिवारी (दि. 6 जुलै) पूर्ण झाली. यात कार्ला येथील रहिवासी असलेले भाविक दीपक निवृत्ती हुलावळे आणि कल्याण-भिवंडी येथील भाविक तथा खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची एकमताने निवड झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्ला एमटीडीसी येथे ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. यात सातही विश्वस्थांनी दोघांना एकमताने मतदान केले. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी महाराष्ट्रातून दोन भाविकांची निवड करण्यात येणार होती. यापूर्वी निवडून आलेल्या सात विश्वस्तांनी या दोन जणांची निवड करायची होती. त्यात सातही विश्वस्तांनी दीपक हुलावळे आणि सुरेश म्हात्रे यांना मतदान केल्याने दोघेही एकमताने विश्वस्त म्हणून निवडून आले. ( Karla News Shri Ekvira Devasthan Trust Trustee Election MP Suresh aka Balyamama Mhatre & Deepak Hulawale Elected )

मावळचे आमदार सुनिल शेळके, गणेश खांडगे तसेच बापूसाहेब भेगडे आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित विश्वस्तांचा सन्मान केला. ‘महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून श्री एकविरा देवस्थानाच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी रस्ते, रोप-वे आदी विकास कामे देखील प्रस्तावित आहेत. नूतन विश्वस्त मंडळाने या पुढील काळात एकमताने काम करत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करावेत, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील सर्वतोपरी मदत करेल,’ असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

या निवड प्रक्रियेमध्ये श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मारुती देशमुख, नवनाथ देशमुख, संजय गोविलकर, महेंद्र देशमुख, सागर देवकर, विकास पडवळ, वर्षा मावकर यांनी सहभाग घेतला. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरज पारेचा व सुहास परांजपे यांनी काम पाहिले. दोन विश्वस्त निवडीची ही प्रक्रिया 2023 सालापासून सुरू होती. मात्र विविध न्यायालयीन बाबींमुळे प्रत्यक्ष निवडीला ६ जुलै हा दिवस उजाडला.

अधिक वाचा –
– ‘भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले’ – मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस
– मावळात आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे कार्य करणाऱ्या ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेला मोठी मदत । Talegaon Dabhade
– मावळात लाडक्या बहिणींसाठी शासन गावात येणार ! 103 गावांमध्ये आणि 24 केंद्रांवर स्विकारले जाणार योजनेचे अर्ज, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याविना मिळणार रेशनकार्ड ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Next Post

खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात बसले होते लपून । Pune Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील 'या' गावात बसले होते लपून । Pune Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Diwali will be sweet for ST employees Decision to provide Rs 6000 as Diwali gift said dcm eknath shinde

गुडन्यूज ! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ; दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

October 14, 2025
Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी

October 14, 2025
Maharashtra State Election Commission

मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

October 14, 2025
Nationalist Congress Party Ajit Pawar group rally at Vadgaon Maval MLA Sunil Shelke present

वडगावमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक ! आरक्षण सोडतीनंतर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा, आगामी निवडणुकांसाठी मोठ्या निर्णयाची शक्यता

October 14, 2025
post of president remained out of reach Upheaval in Maval politics after Pune Zilla Parishad Group Reservation

अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ

October 13, 2025
Blooming International School Gahunje awarded Pune District Education Award 2025

गहूंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलला विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानकडून ‘पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार 2025’ प्रदान

October 13, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.