नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने २४ मे २०२४ या एकाच दिवसात वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळ्या विषयांवरचे पेपर नामांकित जर्नलमध्ये 155 शोधनिबंध यशस्वीरीत्या सादर करून तिसरा विश्वविक्रम प्रस्थापित करून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नवीन कल्पना, विचार , उद्देशांसह विशिष्ट विषयांवर विविध बाजुंनी विचार विनिमय व विविध संदर्भ वापरून शिस्तबद्ध मांडणी करून या शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण कौशल्यावर प्रकाश टाकत शोधनिबंधांमध्ये विविध विषयांचा समावेश आहे. ( Nutan Maharashtra Institute Of Engineering And Technology College released 155 research papers in one day )
संस्थेचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेशची म्हस्के, संस्थेचे विश्वस्त रामदास काकडे, महेशभाई शहा, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी सर्वांचे याबाबत अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. विलास देवतारे, संशोधन व विकास अधिष्ठाता प्रा. प्रितम आहिरे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस, सर्व विभागप्रमुख डॉ.शेखर रहाणे, डॉ. सागर जोशी, डॉ. चंद्रकांत कोकणे, डॉ. सौरभ सावजी यांनी सहकार्याने एकाच दिवसात नामांकित जर्नल्समध्ये 155 शोधनिबंध सादर करून “वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया” मध्ये नोंदणी केली. सर्व विभागीय प्रकल्प समन्वयक, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पूर्ण एनएमआयईटी टीम यांचे सध्या कौतूक होत आहे.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला, जलपर्णीत अडकला होता मृतदेह, शिवदुर्गच्या शोध मोहिमेला यश
– खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात बसले होते लपून । Pune Crime
– अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News