Indori Kundamala Waterfalls : जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. जुलैच्या मध्यात जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. मावळ तालुका हा पर्यटनाचा तालुका म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहे. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणचे पर्यटक जवळचा पर्याय म्हणून मावळ तालुक्याला पसंती देतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातही लोणावळा, खंडाळा, कार्ला, पवना, गडकिल्ले ही पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत. या सगळ्यात इंदोरी जवळील कुंडमळा हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असून येथील रांजणखळगे आणि पाण्याच्या प्रवाहाचे दृश्य पाहायला मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. ( talegaon dabhade indori kundmala waterfalls tourist spot regulations for tourists )
प्रत्येक पावसाळ्यात बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ शेलारवाडी येथील कुंडमळा हे ठिकाण पर्यटकांनी फुलून जाते. येथील कुंड मातेचे मंदीर, रांजणखळगे, बंधाऱ्यावरून वाहनारा इंद्रायणीचा प्रवाह, लोखंडी पूल हे भाग पर्यटकांना आकर्षित करतात. निसर्गाचा हा नजारा पाहणे आणि नयनरम्य निसर्ग ठिकाणाचा आनंद घेणे यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. आताही येथे गर्दी होत आहे. परंतु येथे आल्यावर अनेकदा पर्यटक धोकादायक पर्यटन करतात आणि जिवाला मुकतात. त्यातही रांजणखळग्यांच्या जवळ उभे राहत धोकादायक सेल्फी काढण्याच्या नादात आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
अशा अपघाताचे शेकडो व्हिडिओ आजवर व्हायरल झाले आहेत. तरीही पर्यटकांना त्याचे गांभीर्य नसून दरवर्षा कोणी ना कोणी वाहून गेल्याचे वृत्त येतेत. त्यात येथील पाण्याचा विचित्र प्रवाह आणि रांजणखळगे यामुळे वाहन गेलेल्या व्यक्तीचा शोध घेणे कठीण जाते, असे आपदा मित्र तथा वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे यांनी सांगितले.
यंदाच्या मोसमात अद्याप अपघात घडल्याची किंवा कोणी वाहून गेलेल्याची नोंद नाहीये. परंतू पर्यटकांनी धोकादायक पद्धतीने पर्यटन टाळावे, बंधाऱ्यावरील साकव पुलावरून येजा करू नये, वाहने पाण्यात घालू नये, पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्याच उतरू नये, धोकादायक ठिकाणी उभे राहून सेल्फी काढू नये, जीव धोक्यात घालून पाण्यात उतरू नये असे आवाहन पर्यटकांना प्रशासनाने केले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पाण्याचा प्रवाह वाढला, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भुशी धरण बंद, पर्यटकांचा हिरमोड । Lonavala Bhushi Dam Updates
– पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ, नागरिकांना सावधानतेचा इशारा
– सतर्क राहा ! लोणावळ्यात विक्रमी पाऊस, 24 तासापासून बरसतोय मुसळधार पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन