व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेळेचे बंधन झुगारून टायगर पॉइंट येथे रात्री हुल्लडबाजी करणाऱ्या 5 पर्यटकांवर गुन्हा दाखल; लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

लोणावळा आणि परिसरात सध्या जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले, धबधबे इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाण्याचा अंदाज नसताना धरण क्षेत्रात व धबधब्याच्या क्षेत्रात प्रवेश करू नये.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala-Gramin-Police

File Photo : Lonavla Gramin


मावळ तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 2 जुलै ते 31 जुलै पर्यंत भुशी डॅम, धरण परिसर, गड-किल्ले परिसर, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, पवना धरण, तलाव आणि इतर ठिकाणी सायकांळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही पोलिसांची नजर चुकवून आणि वेळेचे नियम तोडून टायगर पॉइंट येथे हुल्लडबाजी करणाऱ्या 5 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यटकांची नावे,
1) जितेंद्र रमेश वाकळे (वय 37, रा. पनवेल, रायगड)
2) सागर रमेश वाकळे (वय 34, रा. भिवंडी, ठाणे)
3) अंकुश रामचंद्र वाकळे (वय 43, रा. भिंवडी ठाणे)
4) हेमंत सुरेंद्र ढसाळ (वय 33, रा. भायखळा, मुंबई)
5) किरण भासकर सोनावणे (वय 33, रा. कोळीवाडा, ठाणे)

वरील 5 जण शनिवारी (दि. 13 जुलै) रात्री साडेसातच्या सुमारास आतवण गावच्या हद्दीत टायगर पॉइंट येथे वाहन थांबवून एकत्रितरित्या आरडाओरड करताना आणि हुल्लडबाजी करताना मिळून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा आणि परिसरात सध्या जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले, धबधबे इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाण्याचा अंदाज नसताना धरण क्षेत्रात व धबधब्याच्या क्षेत्रात प्रवेश करू नये. तसेच पोलिस प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे आणि सुचनांचे पालन करून ठरवून दिलेल्या वेळेतच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे. ( case filed against 5 tourists who defied time limit and went on a rampage at Tiger Point Lonavala police )

अधिक वाचा –
– कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls
– शाब्बास पोरी ! सानिया गपचुप हिची पदव्युत्तर शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड ; बाळा भेगडे यांच्याकडून सन्मान
– चमकदार कामगिरीबद्दल इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेला अनेक पुरस्कार । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा – खंडाळा भागात तुफान पाऊस ! बोरघाटात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पाणी साठले

Next Post

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल 1 हजार 29 तास 18 मिनिटे कामकाज

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra-Vidhanbhavan

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल 1 हजार 29 तास 18 मिनिटे कामकाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.