मागील अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यात वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे डॉ. विकेश मुथा यांना धन्वंतरी पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अन्य गुणवंत डॉक्टर आणि सी.ए. यांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स च्या वतीने मायमर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्पण महेशगौरी आणि मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नुकताच स्थापन झालेल्या जगातील पहिल्या दिव्यांग बांधवांच्या रोटरी चॅलेंजर्सने क्लबने डॉक्टर व सी.ए. यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी डॉ. शाळीग्राम भंडारी, असिस्टंट गव्हर्नर रवींद्र भावे, रोटरी सिटीचे संस्थापक-अध्यक्ष विलास काळोखे, अध्यक्ष किरण ओसवाल, उपाध्यक्ष भगवान शिंदे, सुरेश शेंडे, सुरेश दाभाडे, सुरेश धोत्रे, रामनाथ कलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. ( Dhanvantari Award from Rotary Club of Talegaon Dabhade Challengers to Dr Vikesh Mutha )
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. मुथा म्हणाले की, आजवर मला विविध 54 पुरस्कार मिळाले मात्र. दिव्यांग बांधवांच्या चॅलेंजर्सकडून मिळालेल्या पुरस्कारामुळे मला नवचैतन्य, ऊर्जा व अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली. यावेळी रोटरी चॅलेंजर्सच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे आश्वासन डॉ. दर्पण महेशगौरी, डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी दिले.
समाज नेहमी दिव्यांग बांधवांना मदत करतो परंतु ह्या क्लबद्वारे समाजाला मदत करून आम्ही समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतोय असे चॅलेंजर्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे यांनी सांगत क्लब स्थापनेची उद्दिष्टे स्पष्ट केली. संजय मेहता यांनी प्रास्ताविक केले. नितीन शहा यांनी धन्वंतरी पुरस्काराच्या मानपत्राचे शब्दांकन आणि वाचन केले. चॅलेंजर्सच्या सर्व डायरेक्टर्स व सदस्यांनी संयोजन केले. दिलीप पारेख यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संदीप भोसलकर यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शिरदे गावात बिबट्याला पकडण्यात यश, उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्रात रवानगी
– कार्ला-लोणावळा भागात मुसळधार पाऊस ! इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’, पंढरपूरमध्ये असणार मुख्यालय