Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागात नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत. मावळातील पावसाची स्थिती पाहून प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी सोमवारपर्यंत पर्यटनस्थळांवर बंदीचे आदेश दिले आहेत. असे असले तरीही या मुसळधार पावसामुळे मावळातील प्रमुख दोन पर्यटनस्थळांच्या ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहे. किल्ले राजमाची येथील मार्गावर दरड कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. तर किल्ले लोहगडाच्या रस्त्यावरही तडे गेले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड –
लोणावळा शहरातून किल्ले राजमाची कडे जाणाऱ्या मार्गावर एकेठिकाणी दरड कोसळल्याची घटना गुरूवारी घडली होती. त्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. मात्र नंतर डेला रिसॉर्ट यांच्या वतीने याठिकाणी जेसीबी आणि इतर मशनरी पाठवून हा मार्ग खुला करण्यात आला. आधीच अर्धकच्चा असलेला हा रस्ता आता दरड कोसळल्यानंतर त्याची अधिक दुरवस्था झाली आहे. ( Havoc of rain Cracks fell on road to Fort Rajmachi cracks on road to Fort Lohgad )
किल्ले लोहगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला तडे –
पवन मावळ भागात सध्या तुफान पाऊस होत आहे. त्यामुळे सततच्या पावसाने डांबरी रस्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. किल्ले लोहगड जवळील लोहगड- घेरेवाडी या प्रमुख डांबरी रस्त्याचे नुकसान झाले असून रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडू रस्ता खचला आहे. हा रस्ता सध्या काही ठिकाणीच खचला किंवा भेगा पडल्या असल्या तरीही यामुळे नागरिकांना भुस्खलनाची भिती वाटत आहे.
अधिक वाचा –
– टाकवे पूल पाण्याखाली गेल्याने आंदर मावळातील 40 ते 50 गावांचे दळणवळण ठप्प ! Maval News
– राज्यात आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर ; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री
– लोणावळा धरण ओव्हरफ्लो ! इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, लोणावळा शहरातील नागरिकांना खबरदारीचा इशारा । Lonavala Dam News