Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराचे माजी अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाचे शहराध्यक्षपद रिक्त होते. तत्काळ दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती करावी अशी विनंती अशोक दाभाडे यांनी केली होती. अशोक दाभाडे यांचा राजीनामा स्विकारण्यात आला असून आता भाजपा तळेगाव दाभाडे शहरच्या प्रभारी अध्यक्षपदी माजी नगरसेवक तसेच पक्षाचे एकनिष्ठ संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संतोष दाभाडे यांनी सन 2013 ते 2016 आणि 2016 ते 2019 या कालावधीमध्ये देखील पक्षाच्या शहर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. संतोष दाभाडे यांच्या नेतृत्वात 2016 मध्ये नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अर्थात तिसऱ्यांदा त्यांच्या शिरावर पक्षाच्या शहर अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. शुक्रवारी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी तसे नियुक्तीचे पत्र दिले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि अन्य सहकाऱ्यांनी दाभाडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ( Appointment of Santosh Dabhade Patil as Talegaon Dabhade City BJP President )
संतोष दाभाडे पाटील हे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सचिव, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, तसेच ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, सह्याद्री इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक पद देखील भूषविलेले आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अधिक वाचा –
– तिहेरी हत्याकांड प्रकरण : अखेर ‘त्या’ तिन्ही मायलेकरांचा शोध थांबवला, नदीची पाणीपातळी वाढल्याने निर्णय । Talegaon News
– पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News
– महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam