व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 2, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Highway From Dehu Road to Chandni Chowk

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार झाला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर असून त्याला मान्यता देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच मान्यता दिली देण्याची ग्वाही दिल्याचे बारणे यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

खासदार बारणे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महामार्गावरील वाकड, ताथवडे येथील वाहतुकीची समस्या त्यांना सांगितली. रस्त्याचे काम करण्याची मंत्रालयाची संपूर्ण तयारी आहे. परंतु, या रस्ते कामाचा जुना ठेकेदार सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे रस्त्याला विलंब होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ( New DPR Prepared For Road Work on Pune Mumbai Highway From Dehu Road to Chandni Chowk )

खासदार बारणे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 मावळ लोकसभा मतदारसंघातून जात आहे. देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारीत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार डीपीआर तयार झाला आहे. देहूरोड ते चांदणी चौक हे काम पूर्ण करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायन्सला दिली होती. परंतु, या मार्गावरील काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम आहे.

देहूरोड आणि वाकड पर्यंतचे क्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत आहे. वाकड ते चांदणी चौकापर्यंतचे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान 12 अंडरपास आणि उड्डाणपूल आहेत. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी या रस्ताचा सुधारीत डीपीआर बनविण्यात आला आहे. रावेत ते चांदणी चौक रस्ता विकसित करण्याबाबतचा डीपीआर अंतिम मान्यतेसाठी मंत्रीमंडळ बैठकीसमोर आहे. त्याला मान्यता देण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली. नवीन डीपीआरला लवकरच मान्यता मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. वाहतूक कोंडीची समस्या संपेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– BREAKING : पवना धरण 91 टक्के भरले, दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
– चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सरसावले । Pune News
– वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ नेमकी काय ? कुणाला मिळणार मोफत सिलिंडर? वाचा सविस्तर


Previous Post

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नवीन रेशन कार्ड काढायचंय? एजंट जास्त पैसे मागतोय? आता चिंता नाही, घरबसल्या काढा ऑनलाइन रेशन कार्ड, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ration-card

नवीन रेशन कार्ड काढायचंय? एजंट जास्त पैसे मागतोय? आता चिंता नाही, घरबसल्या काढा ऑनलाइन रेशन कार्ड, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.