व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना । Crime News

मावळ तालुक्यात जुलै महिन्यात एक संतापजनक घटना समोर आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 6, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यात जुलै महिन्यात एक संतापजनक घटना समोर आली होती. वराळे (ता. मावळ) येथे राहणाऱ्या एक महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तिच्या प्रियकराने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात टाकत असताना रडणाऱ्या तिच्या दोन जिवंत मुलांनाही नदीत ढकलले होते. या घटनेनंतर तालुक्यात मृत मुलांबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. तर महिलेसह तिच्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. दरम्यान प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशिलता लक्षात घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

इंद्रायणीत ढकललेल्या तिघा मायलेकारांचे मृतदेह शोधणे, ही एसआयटीची प्राथमिकता असणार आहे. त्यासोबतच आरोपींना कठोर शासन करण्यासाठी हे एसआयटी काम करत आहे. समरीन निसार नेवरेकर (वय 25) आणि ईशांत (वय 5), इजान (वय 2) अशी शोधशोध सुरू असलेल्या माय लेकरांची नावे आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. समता कॉलनी, वराळे, मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. डॉन बॉस्को कॉलनी, ईश्वरानंद सोसायटी, सावेडी, अहमदनगर), मध्यस्थी महिला उषा बुधवंत आणि गर्भपात करणारा डॉक्टर यांना अटक केली आहे. ( Maval Taluka Triple Murder Case Formation of SIT team for investigation )

ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना सुरुवातीला अटक केली. तसेच तिघा मायलेकरांचा इंद्रायणी नदीत शोध सुरु केला. इंद्रायणी नदी पुढे भीमा नदीत मिसळून उजनी धरणाकडे जाते. पोलिसांनी तळेगाव येथून उजनी धरणापर्यंत नदीकाठच्या सर्व पोलीस ठाण्यांना मृतदेह शोधण्याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान पोलिसांनी गर्भपात करणारा डॉक्टर आणि मध्यस्थी महिला या दोघांना देखील अटक केली आहे.

गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एसआयटी स्थापन केली. पोलीस उपायुक्त बापू बांगर हे या तपासावर पर्यवेक्षण करणार आहेत. तर देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांच्या निगराणीखाली एसआयटी काम करणार आहे. तिघांचे मृतदेह शोधणे हे एसआयटी समोरील आव्हान असणार आहे.

विशेष तपास पथक (एसआयटी) –
सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे (तपास पथक प्रमुख)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर (तपास अधिकारी)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार (तपास मदतनीस)
सहायक पोलीस निरीक्षक एस टी म्हस्के (तपास मदतनीस)
पोलीस हवालदार एस एम भवारी (तपास मदतनीस)

अधिक वाचा –
– जांबवली येथील श्री कोंडेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर मुंबईतील शिवभक्ताकडून चांदीचा पत्रा अर्पण । Maval News
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– अखेर 22 वर्षांच्या लढ्याला यश ! शेलारवाडी आणि तळेगाव येथील डीआरडीओ संपादित जमिनींना वाढीव मोबदला देण्याचे निर्देश


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावात जबरी चोरी, दोन तासांत घरफोडी करून 7 लाखांचा ऐवज चोरला । Talegaon Dabhade

Next Post

आंबी – निगडे रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांचा रास्ता रोको, अवजड वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
आंबी – निगडे रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांचा रास्ता रोको, अवजड वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी । Maval News

आंबी - निगडे रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांचा रास्ता रोको, अवजड वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.