व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रस्त्यांवरील खड्डे बुजवा, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा, खासदार श्रीरंग बारणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना । Pimpri-Chinchwad

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2024
in पुणे, लोकल, शहर, शहर
MP Shrirang Barane instructions to officials

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहरातील रस्त्यांवरील खड्डे चार दिवसात बुजविण्याचे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. वाहतूक कोंडी होणा-या ‘स्पॉट’वर, चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी संदर्भात खासदार बारणे यांनी शनिवारी (दि.3) महापालिका अधिकारी, पोलिसांची एकत्रित बैठक घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, वाहतूक पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, प्रेरणा शंकर, देवण्णा गट्टूवार, सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, निगडीचे वाहतूक पोलीस निरीक्षक शंकर बाबर, वाकडचे सुनील पिंजन, वाहतूक सल्लागार प्रताप भोसले यावेळी उपस्थित होते. ( Plug potholes on roads deploy police to solve traffic jam MP Shrirang Barane instructions to officials )

  • खासदार बारणे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावरील खड्डे हे वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे. खड्ड्यामुळे वाहनांचा वेग संथ होत आहे. त्यासाठी कोल्ड मिक्स, खडी, पेव्हिंग ब्लॉक, सिंमेंट कॉन्क्रीटने येत्या चार दिवसात सर्व खड्डे बुजविण्यात यावेत. पिंपरीतील साई चौक, वाकडमधील लक्ष्मी चौक, हिंजवडी आयटी पार्कमधील सुर्या हॉस्पिटल, भूजबळ, भूमकर चौकडून येणारी वाहतूक वाकडकडे वळविली आहे. त्यामुळे तिथे मोठी वाहतूक कोंडी होते. डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटल दरम्यान दोन्ही बाजूने कोंडी होते. रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड हा झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. महापालिकेला या भागातील नागरिकांकडून मोठा मालमत्ता कर मिळतो. पण, त्या कराच्या तुलनेत नागरिकांना सेवा मिळत नाहीत. त्यामुळे कराच्या 40 टक्के रक्कम या भागातील विकास कामांवर खर्च करावी.

किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपासमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा डीपीआर मंजुरीसाठी पाठविला आहे. परंतु, जुना ठेकेदार (रिलायन्स) उच्च न्यायालयात गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने 12 मीटर आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 12 मीटरचा सेवा रस्ता विकसित करावा. जेणेकरुन या रस्त्यावरुन नागरिक ये-जा करतील. त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होईल अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. याबाबत एनएचआयच्या अधिकारी बाळासाहेब टोंक आणि कदम यांनाही सूचना केल्या आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची या कामासाठी मंगळवारी पुन्हा भेट घेणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

खासगी ट्रॅव्हलसाठी जागा निश्चित करा –
शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या घरात गेली आहे. खासगी ट्रॅव्हलने प्रवास ही नागरिकांची गरज झाली आहे. या ट्रॅव्हल रस्त्यावर उभ्या राहत असल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी ज्या भागात ट्रॅव्हल थांबतात. त्या भागात महापालिकेने ट्रॅव्हलसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करावी. त्याचे शुल्क ट्रॅव्हल व्यावसायिकांकडून वसूल करावे. पिंपरीतील एच.ए मैदान, निगडी, प्राधिकरणात वाहनतळाची व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

शहरात कच-याचे साम्राज्य –
यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई होत नाही. या ठेकेदाराकडून काम केले जात नाही. ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. रस्त्याच्या कडेला कचरा, माती साचली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कच-यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अस्वच्छतेमुळे साथीचे आजारही वाढत आहेत. त्यामुळे शहरात साफसफाई ठेवावी. कोठेही कचरा साचणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिले.

“शहरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. सतत पडणा-या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे तीन दिवसात बुजविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शहरात कोठेही कचरा साचणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले आहेत. वाहतूक कोंडी होणारी ठिकाणी निश्चित करावीत. तिथे पोलीस तैनात करावेत अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. याबाबत 15 दिवसांनी पुन्हा आढावा घेणार आहे.” – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा

“महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवून द्यावेत. वाहतूक कोंडीची ठिकाणी निश्चित केली जातील. त्याठिकाणी पोलीस वाढविण्यात येतील.” – विशाल गायकवाड, वाहतूक पोलीस उपायुक्त

अधिक वाचा –
– रोटरी क्लबकडून मावळातील ब्राम्हणोली गाव दत्तक, समाजसभेची स्थापना, गावात राबवणार विविध समाजोपयोगी उपक्रम
– वडगाव शहरातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval
– किती सोप्पं ! आता नाव, जन्मतारीख बदलण्यासाठी कुठे खेटे मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून मिळवा गॅझेट


Previous Post

तळेगाव-चाकण-शिकापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन, वाचा आदेश । Pune News

Next Post

मावळ तालुक्यात प्रथमच ‘गुरुकुल’ संस्कार वर्गाची स्थापना ; लहान मुलांना मिळणार अध्यात्मिक शिक्षण । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Saibaba Sevadham Kanhe Maval

मावळ तालुक्यात प्रथमच 'गुरुकुल' संस्कार वर्गाची स्थापना ; लहान मुलांना मिळणार अध्यात्मिक शिक्षण । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.