Dainik Maval News : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचच्या वतीने रविंद्र भेगडे यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रविंद्र भेगडे युवा मंच यांच्या वतीने सातत्याने समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंचच्या वतीने सोमटणे येथील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. ( Ravindra Bhegade distributed fruits to patients at Somatne on Independence Day )
तत्पूर्वी भाजपा मावळ विधानसभेचे निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. रविंद्र भेगडे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी भाजपा मावळ तालुका वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. अमित वाघ, स्पर्श हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर, नर्स, कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News