व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजितदादांचे मावळात अतिभव्य स्वागत ; हे स्वागत संस्मरणीय आहे, मावळ तालुक्यासाठी 2 हजार 800 कोटींचा निधी दिला – अजित पवार

महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती पाहून आमदार सुनिल शेळके भावूक ; जनसन्मान यात्रेचे तळेगाव शहरात अभूतपूर्व स्वागत

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 16, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
NCP Ajit Pawar Jan Samman Yatra Talegaon Dabhade Maval Taluka MLA Sunil Shelke

Photo Courtesy : FB / Ajit Pawar & MLA Sunil Shelke


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज (दि. 16 ऑगस्ट) मावळ तालुक्यात दाखल झाली. तळेगाव दाभाडे शहरात अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळकरांनी अजित पवार यांचे अतिभव्य स्वागत केले. जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तळेगावमधील सभेत महिला-भगिनींशी संवाद साधला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव येथील नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मैदानात ही सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी जनसन्मान यात्रेनिमित्त महिला भगिनींशी संवाद साधला. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्यामुळे तळेगाव दाभाडेला भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळं स्थान आहे. ऐतिहासिक तळेगाव दाभाडेला पर्यटनाची जोड पण आम्ही देण्याच्या प्रयत्नात आहोत. जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, पुणे शहरात आम्ही फिरलो. सगळीकडे मायमाऊलींकडून भरभरून मिळालेलं प्रेम पाहून मी सुखावून गेलो, असे अजित पवार म्हणाले. ( NCP Ajit Pawar Jan Samman Yatra Talegaon Dabhade Maval Taluka MLA Sunil Shelke )

मावळसाठी 2 हजार 800 कोटींचा निधी –
मी सरकारमध्ये सामील झाल्यामुळे चांगल्या अभिनव योजना तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी 2 हजार 800 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाद्वारे आम्ही महिन्याला दीड हजार रुपये व वर्षाला 18 हजार रुपये देणार आहोत. एकही भगिनी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. याशिवाय शिक्षणात मोठी सवलत, पिंक ई-रिक्षा योजना यांसारख्या अनेक योजनांचा लाभ माझ्या भगिनींना देण्यासाठी ही जनसन्मान यात्रा काढली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

तसेच, मावळ तालुक्यातील जनसन्मान यात्रादरम्यान जनतेनं केलेले स्वागत हे संस्मरणीय आहे. तमाम मावळवासियांचे मनापासून आभार मानतो, असेही दादा म्हणाले. यावेळी तालुक्यातील महिला वर्गांची मोठी उपस्थिती पाहून आमदार सुनिल शेळके देखील भारावून गेले. सर्व भगिनींनी बांधलेल्या राखीच्या स्वरुपातील निखळ बंधू-प्रेमाची उतराई कधीच होऊ शकत नाही, असे शेळके म्हणाले. त्यांनी आपल्या मनोगतात, विक्रमी संख्येने उपस्थित राहिलेल्या भगिनींविषयी प्रास्ताविकात कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या.

अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडचा आणि बारामतीचा कायापालट केला, पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, याची सल मनाला अजूनही बोचते, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली. अजितदादांनी मावळसाठी खूप काही केले आहे. आणि मावळची जनता त्याची नक्की जाण ठेवील. मावळची जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणारी नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली.

अधिक वाचा –
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News


dainik maval jahirat

Previous Post

रविंद्र भेगडे यांच्या हस्ते सोमाटणे येथे रुग्णांना फळे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा । Ravindra Bhegade

Next Post

तळेगावनंतर अजित पवारांची लोणावळ्यात जनसंवाद सभा, नागरिकांसोबत साधला संवाद, मनोगतात केला महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
NCP Ajit Pawar Jan Samman Yatra Lonavala Maval Taluka MLA Sunil Shelke

तळेगावनंतर अजित पवारांची लोणावळ्यात जनसंवाद सभा, नागरिकांसोबत साधला संवाद, मनोगतात केला महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.