Dainik Maval News : देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन पवनानगर परिसरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच परिसरातील गड किल्ले याठिकाणी उत्साहात संपन्न करण्यात आला. भरताच्या अमृत महोत्सवी ध्वजारोहण निमित्त अनेक ठिकाणी प्रभात फेरी, विविध प्रकारच्या स्पर्धा,शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार यावर्षी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ध्वजारोहण, हर घर तिरंगा जनजागृती रॅली, मेरी माटी मेरा देश, असे विविध उपक्रम राबविले गेले. संकल्प इंग्लिश स्कूल शाळेत स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सावा निमित्त शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत संपूर्ण पवानानगर येथे रॅली काढुन जनजागृती करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पहिल्या (ता.१३ ) दिवसाचे ध्वजारोहणाचा पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले . दुसऱ्या दिवसाचे ध्वजारोहण प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विभागातील शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कोटक महिंद्रा होलसेल बॅंकिंग चे अध्यक्ष परितोश कश्यप व उषा कश्यप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, नृत्य, भाषणे यांचे सादरीकरण केले. यावेळी संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, अध्यक्ष विजय कालेकर, उपाध्यक्ष पोपट कालेकर, संचालिका विद्या गांधी, सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच रमेश कालेकर, अमित कुंभार, फुलाबाई कालेकर, सीमा यादव, प्रल्हाद कालेकर, उत्तम चव्हाण,मुख्याध्यापक राहुल सोनवणे ,एकनाथ कालेकर,आदी मान्यवर मंडळी, पालक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पवना विद्या मंदिर येथील ध्वजारोहण काले पवनानगर ग्रामपंचायतीचे सरपंच खंडुजी कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर,जेष्ठ अध्यापक भारत काळे, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शहाजी कडु माजी विद्यार्थी किशोर शिर्के, हनुमंत राऊत, संदिप कालेकर, यशवंत कालेकर, यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .ग्रामपंचायत काले येथील ध्वजारोहण ग्रामसेवक रविंद्र वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहण काले मंडलाधिकारी सचिन कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण सरपंच खंडू कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले पवना पाटबंधारे विभागाचे ध्वजारोहण शाखाधिकारी रुपेश गावित यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काले येथील ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक विलास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले आणि पवना जलविद्युत निर्मिती केंद्र येथील ध्वजारोहण अतिरिक्त कार्यकारी अभियंता माया कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर परिसरात ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले यामध्ये किल्ले तिकोणा तलाठी राम पुंडे, किल्ले लोहगड तलाठी शरद गाडे, किल्ले विसापूर तलाठी सूर्यकांत राऊत, किल्ले तुंग तलाठी गणेश पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले.पाटबंधारे विभाग येथील ध्वजारोहण शाखा अभियंता रूपेश गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, मुख्याध्यापक दत्तात्रेय कराळे आदी उपस्थित होते.
पवना कृषक सहकारी संस्था येथील ध्वजारोहण संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाबुराव कुभार,विजय भालेराव, गणेश ठोंबरे,विजय वरघडे, महादेव ढाकणे,छाया करडीले, प्रकाश कटाळे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– रविंद्र भेगडे यांच्या हस्ते सोमाटणे येथे रुग्णांना फळे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा । Ravindra Bhegade
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम