Dainik Maval News : महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवी वातावरण आणि महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपुर्तीचा राज्यस्तरीय शुभारंभ म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते. ( Majhi Ladki Bahin Yojana launched in Balewadi in presence of women cm dcm pune news )
महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बहिणींना महिना १५००/- रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे. यामुळे लाखो बहिणी मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यातून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, या योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आजपर्यंत जुलै व ऑगस्ट महिन्याचे १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जमा केले आहेत. रक्षाबंधनाची ही ओवाळणी भेट आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
अधिक वाचा –
– अजितदादांचे मावळात अतिभव्य स्वागत ; हे स्वागत संस्मरणीय आहे, मावळ तालुक्यासाठी 2 हजार 800 कोटींचा निधी दिला – अजित पवार
– रविंद्र भेगडे यांच्या हस्ते सोमाटणे येथे रुग्णांना फळे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा । Ravindra Bhegade
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News