Dainik Maval News : राष्ट्रवादीच्या जन सन्मान यात्रा आणि रक्षाबंधन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळच्या माताबहिणींना दिलेला शब्द पाळला आहे. त्याप्रमाणे (शनिवारी) मावळ विधानसभेतील सुमारे 42 हजार भगिनींच्या बँक खात्यात शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांचे मिळून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले. अजित पवारांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे मावळातील भगिनींची राखी पौर्णिमा यंदा जोरात होणार, हे मात्र नक्की! ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेला तळेगावमध्ये महिलांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी अजितदादा यांना प्रतिनिधिक राखी बांधून रक्षाबंधनही साजरे केले. यावेळी शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता भगिनींच्या खात्यावर जमा झाला का, असे अजितदादांनी विचारले. त्याला उपस्थित भगिनींनी जल्लोषात प्रतिसाद दिला. त्यावर पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यावर (शनिवारी) पैसे जमा झालेले असतील,असा शब्द पवार यांनी दिला होता. ( Ladki Bahin Yojana money deposited in the accounts of 42 thousand women in Maval taluka )
मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यातील भगिनींना योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.अजितदादा हे शब्दाला पक्के असणारे नेते आहेत, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. तालुक्यातील बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.काही तांत्रिक कारणांमुळे पैसे जमा होऊ न शकलेल्या भगिनींना येत्या आठ दिवसांत पैसे मिळतील,असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.
उर्वरित महिलांनी अर्ज भरून घ्यावेत –
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही बहीण वंचित राहू नये,यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज न केलेल्या भगिनींनी नाराज होण्याचे कारण नाही.त्यांनी अजूनही आवश्यक कागदपत्रांसह तातडीने अर्ज भरुन योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन देखील आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर