व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील न्यायालयाची बनावट दाखल्याद्वारे दिशाभूल केल्याबद्दल बोगस जामिनदारावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील न्यायालयाची बनावट दाखल्याद्वारे दिशाभूल केल्याबद्दल बोगस जामिनदारावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक अधिक्षिका यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणात खोटा बनावट दाखल बवनून देण्यात मदत करणाऱ्या सर्वच व्यक्तींवर कारवाई होणार असल्याचे वडगाव पोलिसांनी सांगितले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ (ता.मावळ, जि.पुणे) यांच्या न्यायालयात तळेगाव पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील तुरुंगात असलेल्या आरोपी करणसिंग रजंपूतसिंग दुधाने याचा जामिनदार म्हणुन धनंजयसिंग विजयसिंग परदेशी (रा. थेऊरफाटा, कुंजीरवाडी, ता.हवेली. जि.पुणे) याने दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी न्यायालयासमक्ष हजर होऊन नमुद आरोपीचा ऐपतदाराचा दाखला सादर केला होता. ( case registered against bogus surety who misled Vadgaon Maval court by creating fake document )

तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सदरचा दाखला तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांच्या मार्फत पडताळणीकामी निवासी नायब तहसिलदार हवेली (जि. पुणे) यांच्याकडे पाठविला होता. त्यावेळी तहसीलदार यांनी तो ऐपतदाराचा दाखला दिलेला नाही, असे पत्रासह कळविले. आरोपीत धनंजयसिंग विजयसिंग परदेशी याने तो दाखला निवासी नायब तहसिलदार यांचा खोटा शिक्का तयार करून, खोटा मजकूर नमूद करून बनविला, तो खोटा आहे हे माहीत असतांना तो खरा दर्शवून न्यायालयात वापरला, असे समोर आले.

सदरचा दाखला हा मौल्यवान दस्तऐवज खोटा सादर केला आणि त्याचा वापर केला आणि त्याद्वारे न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सहायक अधिक्षिका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीत धनंजयसिंग विजयसिंग परदेशी याचे विरुध्द त्याने केलेल्या वरील कृत्याकरीता वडगाव मावळ पोलिस ठाणे येथे भा.द.वि.स. कलम 420, 501, 467, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आशिष काळे हे करीत आहेत.

सदरच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा करण्यास मदत करणाऱ्या इतर सहभागी आरोपींवर देखील कारवाई होणार आहे. वडगाव मावळ परिसरात अशा बनावट कागदत्रे बनवून सरकारी कार्यालयाची फसवणूक व अशा बनवेगिरी करण्याऱ्या एजंटावर यापुढेही कारवाई होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केलेले आहे.

अधिक वाचा –
– बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News
– मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड । Pune News
– पवनानगर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये, गड-किल्ले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


dainik maval jahirat

Previous Post

शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News

Next Post

तळेगाव दाभाडे येथे बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा संपन्न ; आमदार शेळकेंनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
construction workers association

तळेगाव दाभाडे येथे बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा संपन्न ; आमदार शेळकेंनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.