Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद याठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांचे हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा कान्हे शाळेतील गुणवंत विद्यार्थी कु. हिंदूराज अनिल कुटे याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 272 गुण मिळवून राज्यात 14 वा क्रमांक मिळवलेला आहे. तसेच हिंदूराजची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. त्यानिमित्त विभागीय आयुक्तांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याच्या मातोश्री नीता कुटे, त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका अनिता गाढवे कार्यक्रमास उपस्थित होत्या.
कु. हिंदूराज कुटे याची जवाहर नवोदय साठी झालेली निवड आणि राज्य गुणवत्ता यादीत मिळवलेले स्थान खरोखरच सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोकांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. मावळ तालुक्यात सर्वत्र हिंदूराजचे कौतूक होत आहे.
कान्हे गावचे आदर्श सरपंच विजयराव सातकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांनी हिंदूराजचे विशेष अभिनंदन केले. विजयराव सातकर यांचे हस्ते हिंदूराजच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कान्हे केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी निर्मला काळे यांनी सदर सत्काराचा स्विकार केला. ( Hinduraj Kute a student of Zilla Parishad School Kanhe was honored at the district level )
अधिक वाचा –
– मावळातील 42 हजार महिलांना मिळाले लाडकी बहीण योजनेचे पैसे ; ज्यांना नाही मिळाले त्यांनी ‘हे’ काम नक्की करा
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News