Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान यंदा मुंबईतील गोवंडी येथील आशिष गोविंदा पथकाने पटकाविला आहे. यासह कार्यक्रमस्थळी पनवेल, लोणावळा येथील साधारण १२ गोविंदा पथके दाखल झाली होती. मावळ गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळचे संस्थापक अध्यक्ष तथा मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला. यंदा ७ लाख ७७ हजार ७७७ रुपये बक्षिसांसह ही दहीहंडी साजरी झाली. गोविंदा पथकांनी हर्षोल्लासाहात सहा, सात थर मनोरे रचून सलामी दिली. यावेळी तळेगाव येथील गगन डान्स अकादमीच्या मुलांनी नृत्य सादरकरीण केले.
यावेळी प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष लायली म्हाळसकर यांचे निमंत्रण स्विकारून खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी आमदार बाळा भेगडे, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, पोलीस निरीक्षक कुमार कदम यावेळी आवर्जून उपस्थित राहिले होते. ( Maval Garjana Pratishthan Dahihandi Festival Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– कान्हे शाळेत बाल गोविंदांनी फोडली दहीहंडी, राधा – कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad